Best SUV Car : तुम्हीही येत्या काही दिवसांनी नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात का? मग आजची ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. आज आपण महिन्याला एक लाख रुपये कमावणाऱ्या लोकांनी कोणती SUV कार खरेदी केली पाहिजे त्यांच्यासाठी कोणती एसयुव्ही कार बेस्ट ऑप्शन ठरू शकते या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरंतर भारतीय कार मार्केटमध्ये एसयूव्ही गाड्यांना नेहमीच मोठी डिमांड असते. विशेषतः तरुणांमध्ये या गाडीची मोठी क्रेज आहे. सेडान कार ऐवजी आता SUV गाड्यांची मोठी क्रेज पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता आपण ज्या लोकांची वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपये आहे त्यांच्यासाठी कोणती एसयुव्ही कार बेस्ट ठरणार? याची माहिती जाणून घेऊयात.
‘या’ SUV कार ठरतील बेस्ट
टाटा कर्व्ह : टाटा मोटर्स ही देशातील एक लोकप्रिय ऑटो कंपनी. या स्वदेशी कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. टाटा कंपनीकडून अनेक SUV कार्स लॉन्च करण्यात आल्या आहेत. कंपनीने अलीकडेच एक नवीन SUV लाँच केली आहे. Tata ने टाटा कर्व्ह कूप ही कार अलीकडेच लॉन्च केली असून या गाडीची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. SUV सेगमेंटमध्ये ग्राहकांना टाटा कर्व्हच्या रूपाने उत्तम पर्याय मिळत आहे. दरम्यान जर तुम्हाला नवीन एसयूव्ही खरेदी करायची असेल आणि तुम्ही वार्षिक 12 लाख रुपयांपर्यंतची कमाई करत असाल तर तुमच्यासाठी ही गाडी बेस्ट ठरणार आहे. टाटा कर्व्ह या कारच्या बेस मॉडेलची सध्याची एक्स शोरूम किंमत 10 लाख रुपये आणि टॉप मॉडेलची किंमत 19.52 लाख रुपये इतकी आहे.

महिंद्रा थार रॉक्स : जर तुमचा महिन्याचा पगार एक लाख रुपये असेल आणि तुम्ही नवीन कार खरेदी करणार असाल तर महिंद्रा थार रॉक्स ही SUV तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकते. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची थार रॉक्स SUV ही कंपनीची एक लोकप्रिय SUV कार आहे. या गाडीची एक्स शोरूम किंमत ही 12.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेल ची किंमत 23.09 लाख एवढी आहे. नक्कीच जर तुमचे वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपये असेल तर तुम्ही ही गाडी परचेस करू शकता.
मारुती सुझुकी ब्रेझा : या यादीत दुसऱ्या कंपनीवर येते मारुती सुझुकी कंपनीची ब्रेझा. खरे तर मारुती सुझुकी ही देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी. या कंपनीची ब्रेझा ही कार ग्राहकांमध्ये फारच लोकप्रिय आहे. सध्या कॉम्पॅक्ट SUV खरेदीदारांची संख्या वाढत आहे आणि ब्रेझा ही अशीच एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही. ही कॉम्पॅक्ट SUV ग्राहकांच्या पसंतीची आहे. या गाडीच्या किमती बाबत बोलायचं झालं तर याच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.69 लाख आणि टॉप मॉडेलची किंमत 14.14 लाख रुपये एवढी आहे.
MG विंडसर EV Pro : महिंद्रा थार रॉक्स आणि मारुती सुझुकी ब्रेझा प्रमाणे MG कंपनीची विंडसर EV Pro ग्राहकांमध्ये फारच लोकप्रिय आहे. ही गाडी JWS MG मोटर इंडियाने नुकतीच लाँच केलीये. ही इलेक्ट्रिक SUV ग्राहकांमध्ये अगदी कमी दिवसात आपले एक वेगळे स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली असून या गाडीची किंमत ही 18.10 लाख रुपयांपासून सुरू होते.