नावाच्या अद्याक्षरावरुन आपला स्वभावगूण कळतो, हे अनेकांना माहित नसेल. परंतु संख्याशास्त्र, अक्षरशास्त्र यासारख्या अनेक विद्यांमध्ये नावाच्या पहिल्या अक्षरापासून किंवा थेट नावापासून भविष्य सांगता येतं. शिवाय त्या व्यक्तीचा स्वभावही कळतो. आज आम्ही तुम्हाला अशा एका नावाच्या अद्याक्षराबाबत सांगत आहोत, ज्या व्यक्ती एकदम नखरेल असतात.
टी अक्षराच्या व्यक्ती
आपल्या सर्वांचे नाव केवळ आपली ओळखच सांगत नाही, तर त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल देखील सांगते. ज्यांचे नाव T अक्षराने सुरू होते त्या व्यक्ती इतरांपेक्षा वेगळ्या असतात. असे म्हटले जाते की या लोकांचा स्वभाव गोंधळलेला असतो. हे व्यक्ती प्रत्येक गोष्टीत राग दाखवतात. हीच गोष्ट लोकांना त्यांच्यापासून दूर ठेवते.

कसा असतो स्वभाव
टी नावाच्या व्यक्तींचा स्वभाव काहीसा रागीट समजलाजातो. या रागामुळे लोक त्यांना सहजासहजी आपले मित्र बनवू इच्छित नाहीत. म्हणूनच खूप कमी लोक त्यांचे मित्र बनू शकतात. या लोकांना वाटते की ते त्यांच्या प्रत्येक कामात परिपूर्ण आहेत. म्हणूनच ते कोणाचीही मदत मागत नाहीत. ज्यामुळे लोकांना असे वाटते की त्यांच्यात नेहमीच अहंपणा असतो. लोकांना या नावाच्या व्यक्तीत गर्व दिसतो, त्यामुळे ते लोक त्यांच्यापासून दूर जातात. पण तसे नसते. खरंतर टी नावाच्या व्यक्तींचा स्वतःवर खूप विश्वास असतो. त्यामुळे ते स्वतः कोणतेही काम सहजपणे करु शकतात. त्यामुळे ते इतरांची मदत घेत नाहीत, असेही सांगितले जाते.
मनाने चांगले असतात
हे लोक सर्जनशील आणि स्टायलिश असतात. गर्दीतही ते वेगळे दिसतात. म्हणूनच लोक त्यांना लक्षात घेतात, पण त्यांना ते नेहमीच आवडत नाहीत. जर त्यांच्या रागीट स्वभावाकडे दुर्लक्ष केले, तर ते मनाने खूप शुद्ध असतात. ते तुम्हाला त्या क्षणापर्यंत साथ देतात जिथे दुसरे कोणीही साथ देत नाही. फक्त स्वतःवर विश्वास असल्याने त्यांना कुणापडे हांजी-हांजी करावे लागत नाही, हे मात्र तितकेच खरे.