अवकाळी पावसातही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अजूनही 40 अंशापर्यंत तापमान असल्याचे सांगितले जात आहे. आर्द्रता आणि वाढते तापमान टाळणे हे एक मोठे आव्हान बनले आहे. पंखे आणि कूलर अनेकदा ही आर्द्रता काढून टाकण्यात अपयशी ठरतात. एअर कंडिशनर (एसी) आर्द्रता कमी करण्यासाठी प्रभावी असते, परंतु त्याची किंमत सामान्यांना परवडत नाही. मग या दमट उष्णतेपासून स्वतःला कसे वाचवायचे? हा प्रश्न पडतो. अशा वेळी डिह्युमिडिफायर हा एक उत्तम पर्याय ठरतो. काय आहे हे प्रोडक्ट? हेच आपण पाहू
डिह्युमिडिफायर म्हणजे काय?
डिह्युमिडिफायर हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. ते हवेतील अतिरिक्त ओलावा काढून टाकून आर्द्रता कमी करते. ते हवा कोरडी आणि आरामदायी बनवते. चिकट उष्णतेपासून आराम देते. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही एअर कंडिशनरपेक्षा स्वस्त आहे. त्याला विजही अगदी कमी लागते. हे बाजारात फक्त 6000 च्या किमतीत उपलब्ध आहे.

काय आहेत फायदे?
1. आर्द्रता कमी करते: ते खोलीतील हवेतील आर्द्रता शोषून घेते. ज्यामुळे दमट उष्णतेपासून आराम मिळतो.
2. स्वस्त आणि किफायतशीर: हे एसीपेक्षा खूपच स्वस्त आहे. शिवाय त्याला वीज खूप कमी लागते.
3. लहान आणि पोर्टेबल: ते टेबलावर सहजपणे ठेवता येते. भिंतीवर चिकटविण्याची सोयही त्याला आहे.
4. वेगवेगळ्या आकारात उपलब्ध: हे लहान खोली, हॉल किंवा स्वयंपाकघर अशा कोणत्याही जागेसाठी खरेदी करता येते.
5. वीज बचत: एसीच्या तुलनेत हे खूपच कमी वीज वापरते, ज्यामुळे वीज बिल कमी येते.
कसे वापरायचे?
ते ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही ते तुमच्या लहान खोलीत, मोठ्या हॉलमध्ये, ऑफिसमध्ये किंवा स्वयंपाकघरात सहज वापरू शकता. जर तुम्हाला मोठ्या क्षेत्रासाठी डिह्युमिडिफायरची आवश्यकता असेल, तर मोठ्या आकाराचे पर्याय देखील उपलब्ध आहेत.