Vande Bharat Sleeper Train : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ही बातमी आहे वंदे भारत स्लीपर ट्रेन च्या बाबत. खरं तर सध्या देशात वंदे भारत एक्सप्रेसच्या जोरदार चर्चा सुरू आहेत आणि प्रवाशांकडून या एक्सप्रेस गाडीला चांगला प्रतिसादही मिळतो. वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये सुरू झाली आहे.
आपल्या महाराष्ट्राला आतापर्यंत अकरा वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळालेली आहे. दुसरीकडे आता राज्याला वंदे भारत स्लीपर ट्रेनची सुद्धा भेट मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशाच्या आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचे राज्य राजधानी मुंबईवरून लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरु होणार आहे.

या वंदे भारत ट्रेन मुळे मुंबई ते आग्रा प्रवास वेगवान होणार आहे. ही ट्रेन अलिगड ते मुंबई व्हाया आग्रा धावणार अशी बातमी मिळेल रिपोर्ट मधून समोर आली आहे. अशा परिस्थितीत आता आपण संभाव्य मुंबई – अलीगड वंदे भारत स्लीपर ट्रेन बाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा असणार रूट?
अलीगड मुंबई स्लीपर वंदे भारत ट्रेन आग्रा वरून चालवले जाणार आहे. ही गाडी 1350 किलोमीटरचे अंतर दहा तासात पार करणार आहे. खरे तर सध्या स्थितीला या दोन्ही शहरात दरम्यानचे अंतर पार करण्यासाठी जवळपास 16 ते 17 तास लागतात.
मात्र स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यानंतर मुंबई – अलिगड प्रवास वेगवान होणार आहे. महत्त्वाची बाब अशी की याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला आहे. अजून हा प्रस्ताव मंजूर झालेला नाही मात्र येत्या काही दिवसांनी या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.
जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे, इंदूरनंतर आग्र्याला दुसरी स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस मिळू शकते. यामुळे आग्रा ते मुंबई प्रवास सोपा होईल. हा प्रवास 10 तासांत पूर्ण होईल. याशिवाय, हजरत निजामुद्दीन आणि इंदूर दरम्यान स्लीपर वंदे भारत तसेच आग्रा आणि अयोध्या दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस प्रस्तावित आहेत.
या दोन्ही गाड्यांचा प्रस्ताव सुद्धा रेल्वे बोर्डाकडे प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या देखील प्रस्तावाला परवानगी मिळाली की या गाड्यांचे संचालन सुरू होईल.
अलिगड ते मुंबई व्हाया आग्रा या स्लीपर वंदे भारत एक्सप्रेससाठीचा प्रस्ताव तयार करून एका वर्षापूर्वीच रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र अजून तरी याला मान्यता मिळालेली नाही पण येत्या काही दिवसांनी यावर सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आहे.
कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार वंदे भारत स्लीपर
रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून समोर आलेल्या माहितीनुसार ही ट्रेन अलीगड, आग्रा, ग्वाल्हेर, झाशी, बिना, भोपाळ, इटारसी, खंडवा, जळगाव, मनमाड या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेण्याची शक्यता आहे. म्हणजे ही गाडी राज्यातील फक्त दोन रेल्वे स्थानकावर थांबेल असे बोलले जात आहे.