Vande Bharat Train : सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे कडून नुकत्याच काही महिन्यांपूर्वी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. खरे तर वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील पहिली स्वदेशी बनावटीची सेमी हायस्पीड ट्रेन आहे.
ही ट्रेन सुरुवातीला 2019 मध्ये रुळावर धावली होती आणि त्यानंतर मग देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले. ही गाडी पहिल्यांदा नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली आणि त्यानंतर मग टप्प्याटप्प्याने या गाडीचे नेटवर्क वाढवण्यात आले.

सध्या स्थितीला ही गाडी देशातील जवळपास सर्वच महत्त्वाच्या राज्यांमध्ये सुरू आहे. आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्याला आत्तापर्यंत 11 महत्त्वाच्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळालेली आहे. पुणे ते हुबळी या मार्गांवर देखील वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली आहे.
ही गाडी सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून धावते आणि यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांना या गाडीचा मोठा फायदा होतोय. दरम्यान आता आपण या गाडीचे वेळापत्रक तसेच ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेते या संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं आहे वेळापत्रक ?
पुणे – हुबळी वंदे भारत एक्सप्रेस 16 सप्टेंबर 2024 रोजी सुरू करण्यात आली. या गाडीचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडण्यासाठी ही गाडी सुरू झाली.
या मार्गावर धावणारी वंदे भारत ट्रेन 160 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावण्यास सक्षम आहे. या गाडीच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर ही गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून दुपारी सव्वाचार वाजता सोडली जाते.
ही गाडी आठवड्यातून तीन दिवस म्हणजेच रविवार, बुधवार आणि शुक्रवारी चालवली जाते. या गाडीमुळे पुणे ते हुबळी हा प्रवास साडेआठ तासात पूर्ण होतो. तसेच कोल्हापूर ते पुणे हा प्रवास हा अवघ्या तीन ते चार तासात होतो.
या ट्रेनमुळे सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या गाडीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय.
कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबते वंदे भारत ट्रेन?
पुणे – हुबळी रेल्वे मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर वंदे भारत ट्रेनला थांबा देण्यात आला आहे. ही गाडी या मार्गावरील सातारा, कराड, सांगली, मिरज, कोल्हापूर, बेळगाव आणि धारवाड येथे थांबते अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.