आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर शिपायापासून ते क्लर्कपर्यंत, कोणाचा पगार किती वाढणार ? वाचा…

तुम्हीही सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत आहात का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. ही बातमी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास राहणार आहे, कारण आठव्या वेतन आयोगात क्लर्क पासून ते शिपायापर्यंतचा पगार किती वाढणार याबाबत नवीन अपडेट हाती आली आहे. 

Published on -

8th Pay Commission : जानेवारी महिन्यात मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आणि तेव्हापासूनच नव्या आयोगाच्या जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान जर तुम्हीही शासकीय सेवेत कार्यरत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची राहणार आहे.

कारण की आज आपण आठवा वेतन आयोग प्रत्यक्षात जेव्हा लागू होईल तेव्हा कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढू शकतो याचा एक आढावा घेणार आहोत.

प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग

नवा वेतन आयोगाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत आला आहे. यानुसार सध्याचा सातवा वेतन आयोग 31 डिसेंबर 2025 रोजी समाप्त होईल कारण की एक जानेवारी 2016 पासून सध्याचा सातवा वेतन आयोग लागू आहे.

यामुळे आता 2026 मध्ये नव्या आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. एक जानेवारी 2026 पासून नवीन आठवा वेतन आयोग लागू होईल असे बोलले जात आहे.

8th Pay Commission मुळे पगार किती वाढणार? 

8 व्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? हा मोठा सवाल आहे. जाणकार लोक सांगतात की नव्या आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरच्या आधारे वेतन वाढविले जाईल.

फिटमेंट फॅक्टर हा एक गुणक  राहणार आहे, ज्याद्वारे विद्यमान मूळ वेतनाचा गुणाकार करून नवीन पगार निश्चित केला जाईल. सध्याच्या 7 व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 इतके होते.

या फॅक्टरमुळे सातव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार 11000 रुपयांनी वाढला होता. सहाव्या वेतन आयोगात किमान मूळ वेतन 7000 होते जे की सातवा वेतन आयोगात 18000 झाले.

आता या नव्या आठव्या वेतन आयोगात सुद्धा फिटमेंट फॅक्टर 2.86 असेल असा एक अंदाज समोर आला आहे. दरम्यान जर आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.86 राहिले तर कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18,000 रुपयांवरून 18000×2.86 = 51,480 रुपयांपर्यंत वाढू शकते.

त्याचप्रमाणे पेन्शन 9,000 रुपयांवरून थेट 25,740 रुपयांवर पोहचणार आहे. नव्या आठव्या वेतन आयोगात लेव्हल-1 मधील केंद्रीय कर्मचाऱ्यांचा म्हणजेच शिपाई आणि अटेंडंट अशा पदांवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार 18,000 वरून 51,480 पर्यंत वाढणार असा अंदाज आहे.

तसेच, लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) चा पगार हा 19,900 रुपयांवरून 56,914 रुपयांपर्यंत वाढू शकतो. तसेच नव्या वेतन आयोग आता हवालदार म्हणजे कॉन्स्टेबल आणि कुशल कर्मचाऱ्यांचा पगार 62,062 रुपये होऊ शकतो.

स्टेनोग्राफर आणि कनिष्ठ लिपिक यांचा पगार 72,930 रुपयांपर्यंत वाढू शकतो. वरिष्ठ लिपिक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांच वेतन सुद्धा 83,512 रुपयांपर्यंत वाढू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe