मे महिन्याचा हफ्ता खात्यात जमा होण्याआधीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. या योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा होण्याआधीच सरकारकडून या योजनेच्या बाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Published on -

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात एकूण दहा त्यांचे पैसे जमा झाले असून अकरावा हप्ता देखील लवकरच महिलांच्या खात्यात वर्ग होणार असल्याची बातमी समोर येत आहे.

एप्रिल महिन्याचा लाभ दोन मे 2025 रोजी पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आणि आता मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात या योजनेचा मे महिन्याचा हप्ता म्हणजेच अकरावा हप्ता जमा होईल अशी बातमी समोर आली आहे. दरम्यान मे महिन्याचा हप्ता जमा होण्याआधीच लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

लाडकी बहीण योजनेची पुन्हा पडताळणी 

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या शिंदे सरकारने मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा उघड झाला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी पुरुषांच्या केवायसी कागदपत्रांचा गैरवापर करून सायबर व हवाला गुन्हे करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

जुहू पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईनंतर महाराष्ट्रात एकच खळबळ माजली आहे. आता जुहू पोलिसांच्या या कारवाईनंतर महिला व बालविकास विभागाने युद्धपातळीवर पडताळणीचे आदेश सुद्धा सर्व जिल्ह्यांना दिलेले आहेत.

म्हणजेच या योजनेतील लाभार्थी महिलांची पुन्हा एकदा पडताळणी होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या राज्यातील 2 कोटी 47 लाख महिलांना या योजनेचा लाभ दिला जात आहे.

मात्र, यामध्ये निकषात न बसणाऱ्या लाखो महिलांचा सुद्धा समावेश असल्याचे उघड झाले असून याचमुळे आता पुन्हा एकदा पडताळणी केली जाणार आहे.

या योजनेसाठी अपात्र असतांनाही काहींनी पुरुषांचे केवायसी वापरून लाभ घेतल्याचे समोर आले आहे. महिला आणि पुरुष यांच्या नावातील समानतेमुळे चुकीच्या खात्यांवरही पैसे जमा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या गोष्टींची पडताळणी होणार 

महायुती सरकारला लाडकी बहीण योजनेचा निवडणुकीमध्ये मोठा फायदा झाला आहे. विधानसभा निवडणूकित महायुतीला जे प्रचंड यश मिळाले त्यामध्ये या योजनेचा मोठा हातभार होता.

दरम्यान आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाभार्थींना नाराज न करता ही योजना सुरळीत सुरु ठेवण्यासाठी महायुती सरकारकडून शुद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

यासाठी आता लाभार्थ्यांची आधार-बँक जुळणी, शिधापत्रिका पडताळणी अशा सर्व बाबींची काटेकोर छाननी होणार असे जाणकारांकडून सांगितले गेले आहे.

सरकारने लाखो रुपये अपात्र खात्यांवर गेल्याचे मान्य करत तातडीने सुधारणा करण्याचे आश्वासन यावेळी दिले आहे. यामुळे आता या योजनेसाठी अपात्र असणाऱ्या अनेकांना मे महिन्याचा लाभ मिळणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe