महाराष्ट्रातील रेशन कार्डधारकांवर सरकारची मोठी कारवाई ! शिधापत्रिका धारकांमध्ये भीतीचे वातावरण, आतापर्यंत 18 लाख कार्ड झालेत बंद

राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील 6.85 कोटी रेशन कार्डधारकांपैकी जवळपास 18 लाख रेशन कार्ड धारकांची रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहे. आज आपण या संबंधित लोकांचे रेशन कार्ड का रद्द झाले? याबाबत माहिती पाहणार आहोत.

Published on -

Maharashtra Ration Card News : महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरतर, राज्यातील लाखो रेशन कार्ड धारकांचे रेशन कार्ड रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे.

यामुळे अपात्र असतानाही रेशनचा लाभ घेणाऱ्या लोकांचे धाबे दणाणले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत राज्यातील तब्बल 18 लाख रेशन कार्डधारकांची रेशन कार्ड रद्द झाले असून आगामी काळात ही संख्या आणखी वाढणार आहे.

दरम्यान आता आपण रेशन कार्ड धारकांची रेशन कार्ड रद्द होण्याचे नेमके कारण काय, सरकारने हा निर्णय का घेतला आहे ? या संदर्भातील सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत.

18 लाख लोकांची रेशन कार्ड रद्द करण्याचे कारण?

खरेतर सरकारच्या रेशनचा अनेक लोक पात्र नसतानाही लाभ घेत असल्याचे उघडकीस आले होते आणि यामुळे अशा लोकांवर कारवाई होणे अपेक्षित होते. याच अपात्र लोकांवर कारवाई व्हावी या अनुषंगाने अपात्र लोकांची ओळख पटवण्यासाठी शासनाने एक विशेष मोहीम हाती घेतली होती.

राज्यातील अपात्र रेशन कार्ड धारकांची ओळख पटवण्यासाठी रेशनकार्ड ई-केवायसीची मोहिम सरकारकडून हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेमुळे सरकारच्या अन्नधान्यावर डल्ला मारणाऱ्या लाखो लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की अनेक जण गलेलठ्ठ पगार, सरकारी नोकरदार, व्यापारी, व्यावसायिक, श्रीमंत असताना सुद्धा सरकारच्या रेशनचा लाभ घेत होते. खरंतर सरकारी रेशन हे फक्त गरीब लोकांसाठी आहे मात्र याचा लाभ अनेक श्रीमंतांकडून घेतला जातोय.

अनेकजन सरकारी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विविध खासगी कंपन्यांतील गलेलठ्ठ पगारदार, व्यापारी आहेत मात्र त्यांच्याकडेही रेशन कार्ड आहे. हे लोक दर महिन्याला सरकारकडून दिले जाणारे रेशन उचलतात आणि ते लोक दुसरीकडे धान्याची विक्री करतात.

एवढेच नाही तर काही बांगलादेशी नागरिक सुद्धा रेशनचा लाभ घेत असल्याचे उघडकीस आले होते. दरम्यान याच साऱ्या अपात्र लोकांवर आता केवायसी मोहिमेमुळे मोठी कारवाई करण्यात आली असून आत्तापर्यंत तब्बल 18 लाख रेशन कार्ड धारकांची रेशन कार्ड रद्द करण्यात आली आहेत. महत्त्वाची बाब अशी की आगामी काळात आणखी काही अपात्र लोकांची शिधापत्रिका रद्द होणार आहे.

दीड कोटी कार्डधारकांची ई-केवायसी प्रलंबित 

खरंतर, महाराष्ट्रात जवळपास 6.85 कोटी रेशन कार्डधारक आहेत. दरम्यान या एकूण रेशन कार्डधारकांपैकी आतापर्यंत 5.20 कोटी लोकांनी ई-केवायसी पूर्ण केलेली आहे. दरम्यान आतापर्यंत जितकी केवायसी कम्प्लीट झाली आहे त्यानुसार 18 लाख रेशन कार्ड रद्द झाले आहे.

आता अजून 1.65 कोटी रेशन कार्डधारकांची केवायसी प्रलंबित आहे. यामुळे आगामी काळात अजून काही लोकांचे रेशन कार्ड रद्द होणार असे म्हटले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe