Pm Awas Yojana : पीएम आवास योजना ही केंद्रातील सरकारकडून सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून बेघर लोकांना घरकुल उपलब्ध करून दिले जात आहे. या योजनेतून घरकुल बांधण्यासाठी शासनाकडून अनुदान स्वरूपात मदत केली जाते.
या योजनेचा आतापर्यंत देशभरातील करोडो लोकांनी लाभ घेतला आहे आणि आगामी काळातही या योजनेच्या माध्यमातून देशभरातील करोडो लोकांना लाभ मिळेल अशी आशा आहे. महाराष्ट्रातही ही योजना सुरू आहे आणि या अंतर्गत बेगर लोकांना घरकुल उपलब्ध होतंय.

ही योजना सर्वसामान्यांमध्ये मोठी लोकप्रिय आहे. या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. विशेषतः अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांना या अंतर्गत प्राधान्य दिले जात आहे.
खरे तर भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वाधिक वेगाने प्रगती करणारी अर्थव्यवस्था म्हणून ओळखले जात असून आता आपण जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलोय. याबाबतीत आपण नुकतेच जपानला मागे टाकले आहे.
मात्र अशी सारी परिस्थिती असतानाही देशात बेघर लोकांची संख्या फारच उल्लेखनीय आहे आणि अशाच बेघर लोकांसाठी पीएम आवास योजना सुरू करण्यात आलीये. दरम्यान जर तुम्ही ही पीएम आवास योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुमच्याकरिता आजची बातमी कामाची राहणार आहे. खरे तर पीएम आवास योजनेत नोंदणीसाठी डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
तुम्हाला घर मंजूर झाले आहे की नाही, कसं चेक करणार?
जर तुम्ही Pm Awas योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती चेक करायची असेल तर यासाठी तुम्हाला PMAY च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. https://pmaymis.gov.in ही पीएम आवास योजनेची अधिकृत वेबसाईट आहे.
जर तुमच्याकडे Assessment नंबर असेल तर तुम्ही या वेबसाईटवर जाऊन Menu मध्ये जाऊन Citizen Assessment या पर्यायावर क्लिक करा. यानंतर मग तुम्हाला Search by Name, Mobile No. इत्यादी दोन पर्याय दिसतील. तुम्हाला यापैकी ‘Search by Name’ हा पर्याय निवडायचा आहे.
त्यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी विचारलेली सर्व प्रकारची माहिती भरावी लागणार आहे. राज्य, जिल्हा, शहर, अर्जदाराचं नाव, वडिलांचं नाव, मोबाईल नंबर अशी महत्त्वाची माहिती तुम्हाला येथे विचारली जाईल. ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटणावर क्लिक करायचे आहे आणि मग तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती समजणार आहे.
Assessment नंबर असल्यास अर्जाची स्थिती कशी चेक करणार?
जर तुम्ही पीएम आवास योजनेसाठी अर्ज केलेला असेल आणि तुम्हाला या अर्जाची स्थिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही अवघ्या दोन मिनिटात आपल्या असेसमेंट नंबरचा वापर करून ही स्थिती चेक करू शकता. तुमच्याकडे जर Assessment नंबर असेल तर तुम्ही पीएम आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा. वेबसाईटवर जाऊन मेनू मध्ये जा आणि मग Citizen Assessment मध्ये जाऊन Assessment ID चा पर्याय निवडा.
हा पर्याय निवडला की मग तुमचा Assessment नंबर व मोबाईल नंबर टाका. यानंतर तुम्हाला Submit बटनावर क्लिक करायचे आहे. यानंतर मग तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे की नाही याची सविस्तर माहिती स्क्रीनवर दिसणार आहे.