Maharashtra Schools : राज्यातील शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी शिक्षकांच्या उन्हाळी सुट्टी संदर्भातील आहे. खरे तर गेल्या महिन्यात राज्यातील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या लागल्यात आणि या महिन्याच्या सुरुवातीला शिक्षकांना सुट्टी जाहीर करण्यात आली. पण आता लवकरच राज्यातील शिक्षकांची सुट्टी संपणार आहे. दरम्यान आता आपण याच संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
शिक्षकांना आणखी किती दिवस सुट्टी राहणार ?
राज्यातील शिक्षकांना फक्त एक जून 2025 पर्यंत सुट्टी राहणार आहे. यानंतर शिक्षकांची उन्हाळी सुट्टी संपणार आहे. कारण की, यानंतर शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राज्यातील शिक्षकांसाठी निवड व वरिष्ठ वेतनश्रेणीसंदर्भात नुकताच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयानुसार, बारा व 24 वर्षांची सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे सोबतच नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला असल्याने या संदर्भातील प्रशिक्षण सुद्धा शिक्षकांना दिले जाणार आहे.
जाणकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 12 व 24 वर्षांची सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना निवड किंवा वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यात येते, मात्र यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण पूर्ण करावे लागते आणि हेच प्रशिक्षण आता जून महिन्यात सुरु होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुढील महिन्यात दोन तारखेला हे प्रशिक्षण सुरू होईल आणि 11 तारखेपर्यंत राहणार आहे. त्याचबरोबर नविन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार असून, या संदर्भातील प्रशिक्षण सुद्धा पुढल्या महिन्यातच होणार आहे.
हे दोन्ही प्रशिक्षण सोबतच नियोजित करण्यात आले आहेत. पहिलीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला असल्याने यासंदर्भातील प्रशिक्षण सुद्धा दोन जून पासून सुरु होणार आहे आणि 15 जून पर्यंत सुरू राहील अशी माहिती देण्यात आली आहे.
मात्र, निवड/वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी पात्र असलेले शिक्षक एकाचवेळी दोन्ही प्रशिक्षणात सहभागी होऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण 13 ते 15 जून दरम्यान स्वतंत्रपणे घेतले जाईल अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे आता राज्यातील शिक्षकांची उन्हाळी सुट्टी केवळ 1 जूनपर्यंतच राहणार आहे. कारण की, 2 जूनपासून सर्व शिक्षकांना प्रशिक्षणासाठी हजर राहणे अनिवार्य राहणार अशी माहिती संबंधितांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाची उन्हाळी सुट्टी रद्द झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार?
नवीन शैक्षणिक वर्ष पुढील महिन्यात सुरु होईल. यावर्षी विद्यार्थ्यांच्या परीक्षा उशिरापर्यंत सुरू होत्या, यामुळे नवीन शैक्षणिक वर्षही उशिराने सुरू होईल की काय असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांकडून उपस्थित केला जात होता. मात्र शैक्षणिक वर्ष 2025 – 26 यावर्षीही वेळेतच सुरु होणार आहे. आगामी शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरु होणार असून शाळा 16 जून 2025 रोजी खुल्या होतील.