Maharashtra Best Picnic Spot : तुमचाही पिकनिकला जाण्याचा प्लॅन आहे का मग आजचा हा लेख तुमच्या कामाचा राहणार आहे. खरे तर येत्या काही दिवसांनी पावसाळ्याला सुरुवात होणार आहे.
राज्यातील काही भागांमध्ये तर मान्सून पूर्व पावसामुळे आताच पावसाळी वातावरणासारखा अनुभव येतोय. खरे तर पावसाळा सुरू झाला की धबधबे प्रवाहीत होत असतात.

सहसा पावसाळ्याच्या दिवसांमध्येच धबधबे परवा येत होत असतात मात्र आज आपण अशा एकां युनिक धबधब्याची माहिती जाणून घेणार आहोत जो की उन्हाळ्यात सुद्धा प्रवाहित होतो आणि यामुळे हा धबधबा पाहण्यासाठी उन्हाळ्यात सुद्धा पर्यटक गर्दी करतात.
महत्त्वाची बाब म्हणजे हा युनिक धबधबा आपल्या महाराष्ट्रातच आहे. राज्याच्या कोकणात हा धबधबा स्थित असून आज आपण याच संदर्भातील डिटेल माहिती जाणून घेऊया.
हा आहे बारा महिने प्रवाहित राहणारा धबधबा
दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात मार्लेश्वर येथे हा धबधबा आहे. मार्लेश्वर हे रत्नागिरीतील एक महत्त्वाचे आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी पर्यटकांची बारा महिने गर्दी पाहायला मिळते. हे राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील याच धबधब्याच्या समोर एक खोल डोह आहे, जे किती खोल आहे याचा अद्याप अंदाज लावता आलेला नाही. हा एक निसर्ग सौंदर्याने नटलेला आणि मनाला शांती देणारा परिसर आहे.
येथील नैसर्गिक सौंदर्य आणि मन प्रसन्न करणारी शांतता पर्यटकांना विशेष आकर्षित करते. मार्लेश्वर या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रावरील धबधबा हा बारा महिने प्रवाहित राहतो. उन्हाळ्यात सुद्धा हा धबधबा वाहत राहतो. यामुळे येथे पावसाळ्याप्रमाणेच उन्हाळ्यातही पर्यटकांची मोठी गर्दी दिसते.
अनेकजण हिवाळ्यातही या ठिकाणी येतात आणि आपल्या परिवारासमवेत पिकनिकचा आनंद घेतात. सह्याद्री मधून कोसळणारा हा धबधबा प्रचंड वेगाने प्रवाहित होतो. मार्लेश्वराच्या मंदिराजवळ असणाऱ्या या धबधब्याला धारेश्वर असे नाव देण्यात आले आहे.