सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी वाढ ! 17 मे 2025 रोजीचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय ? महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील रेट पहा…

सोन्याच्या किमतीत आज पुन्हा एकदा मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती कमी होत होत्या मात्र कालपासून सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत आता आपण राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सध्या सोन्याचा भाव कसा आहे याबाबतचा आढावा घेणार आहोत.

Published on -

Gold Price Today : सोन्याच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढउतार सुरू आहेत. पाच दिवसांपूर्वी अर्थातच 12 मे 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत दहा ग्रॅम मागे 3220 रुपयांची मोठी घसरण झाली. यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 13 मे ला सोन्याची किंमत 1140 रुपयांनी वाढली.

नंतर किमतीत पुन्हा एकदा 540 रुपयांची घसरण झाली. 15 मे 2025 रोजी सोन्याच्या किमतीत तब्बल 2130 रुपयांची घसरण नमूद करण्यात आली. पंधरा तारखेला 22 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 100 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 930 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी होती.

पण काल 16 मे रोजी सोन्याच्या किमतीत थोडीशी वाढ झालेली आहे. आज सुद्धा सोन्याच्या किमतीत वाढीचा ट्रेंड कायम असल्याचे दिसते. अशा परिस्थितीत आता आपण सध्या राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याला काय भाव मिळतोय याचा आढावा घेणार आहोत.

16 मे 2025 रोजीचा सोन्याचा भाव

16 मे 2025 रोजी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत अकराशे रुपयांनी आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत बाराशे रुपयांनी वाढली.

या दिवशी 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 130 रुपये एवढी राहिली. तसेच 16 तारखेला 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.

शिवाय, नाशिक, वसई विरार, लातूर, भिवंडी या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत अकराशे रुपयांनी आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत बाराशे रुपयांनी वाढली.

या शहरांमध्ये 16 मे 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 230 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 160 रुपये एवढी राहिली. तसेच 16 तारखेला 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 380 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.

राज्यातील प्रमुख शहरांमधील आजचा सोन्याचा भाव

मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, जळगाव, कोल्हापूर : 17 मे रोजी 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 360 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 140 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 210 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी राहिली.

नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी : राज्यातील या प्रमुख शहरांमध्ये आज 17 मे रोजी 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 390 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 170 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 240 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी राहिली. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News