Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वेने नुकताच एक मोठा निर्णय घेतलाय. जर तुम्हीही रेल्वेने प्रवास करत असाल तर रेल्वेचा हा निर्णय तुमच्याही कामाचा राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे कडून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही गाडी आपल्या महाराष्ट्रातून धावणार आहे.

उधना ते गया रेल्वे स्थानकादरम्यान ही नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार असून या गाडीला उत्तर महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.
अशा परिस्थितीत, आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक तसेच ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबणार ? या संदर्भातील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक ?
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे उधना – गया विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवणार आहे. ही गाडी आठवड्यातून एक दिवस धावणार आहे म्हणजेच साप्ताहिक राहील. पश्चिम रेल्वेने सांगितल्याप्रमाणे उधना – गया उन्हाळी विशेष ट्रेन (ट्रेन क्रमांक 09039) 23 मे ते 27 जून 2025 या काळात चालवली जाणार आहे.
ही गाडी या काळात दर शुक्रवारी उधना येथून सोडली जाणार आहे. या काळात उधना येथून ही गाडी दर शुक्रवारी 22.00 वाजता रवाना होणार आहे आणि रविवारी सव्वा तीन वाजता गया रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
तसेच परतीच्या प्रवासात गया – उधना विशेष ट्रेन (ट्रेन क्रमांक 09040) 25 मे ते 29 जून 2025 या काळात चालवली जाणार आहे. या काळात ही गाडी दर रविवारी सकाळी 7:10 मिनिटांनी गया रेल्वे स्थानकावरून निघणार आहे आणि दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता उधना रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
विशेष गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबणार?
उधना ते गया दरम्यान चालवली जाणाऱ्या या साप्ताहिक विशेष ट्रेनला उत्तर महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर झालेला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, अमळनेर, जळगाव, भुसावळ या स्थानकावर ही गाडी थांबणार आहे.
पश्चिम रेल्वेचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे ही गाडी चारठाणा, बारडोली, नंदुरबार, अमळनेर, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर,
प्रयागराज छेओकी, मिर्झापूर, पं. दीनदयाल उपाध्याय, सासाराम अशा महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेईल आणि यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.