Maharashtra Railway : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना लवकरच एक नवीन रेल्वे मार्ग मिळणार आहे यामुळे राज्यातील प्रवाशांचा प्रवास सुपरफास्ट होईल अशी आहे. खरे तर सध्या भारतातील रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क आहे. तसेच देशात एकूण साडेसात हजार रेल्वे स्थानक अस्तित्वात आहेत.
देशातील या रेल्वे नेटवर्कमुळे प्रवाशांचा प्रवास फारच सोयीचा झाला आहे. दरम्यान राज्यातील रेल्वे नेटवर्क आणखी वाढणार आहे कारण की राज्याला एक नवा रेल्वे मार्ग मिळणार असून या प्रकल्पाला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता आपण राज्यातील या नव्या रेल्वे मार्गाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसा असणार नवा रेल्वे मार्ग?
हा नवा रेल्वे मार्ग मुंबई महानगर क्षेत्रात तयार होणार आहे. यामुळे एमएमआर क्षत्रातील वाहतूक आणखी सुरळीत होईल अशी आशा आहे. एम एम आर क्षेत्रात एक नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प उभारला जाईल आणि यामुळे या भागातील वाहतूक केला चालना मिळणार आहे.
या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर हा एक 29 km लांबीचा रेल्वेमार्ग प्रकल्प असेल आणि याची किंमत ही साधारणता 500 कोटी एवढी राहणार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास 491 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प अंतर्गत कर्जत ते पनवेल दरम्यान चौथी मार्गीका तयार केली जाणार आहे. या कर्जत ते पनवेल दरम्यानच्या चौथ्या मार्गीकेला नुकतीच मंजुरी मिळालेली आहे.
हा नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पुणे यांच्यात थेट संपर्क प्रस्थापित करणार आहे. यामुळे याचा नवी मुंबई ते पुणे या दरम्यानचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील मोठा फायदा होईल अशी आशा आहे.
डीपीआर 2023 मध्ये सादर झाला
या रेल्वे मार्ग प्रकल्पाचा डीपीआर दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2023 मध्ये तयार करण्यात आला होता. दोन वर्षांपूर्वी हा डीपीआर रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला.
या प्रकल्पाचा महत्त्वाचा उद्देश या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करणे आणि उपनगरीय रेल्वे सेवा सुधारणे हाच आहे. महत्वाची बाब अशी की या प्रकल्पाचे काम येत्या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
हा रेल्वे मार्ग प्रकल्प 30 किलोमीटर पेक्षा कमी आहे पण याचे फायदे फारच अधिक आहेत आणि यामुळे एमएमआर क्षत्रातील वाहतूक फारच वेगवान होईल अशी आशा आहे.