महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी Good News ! 18 मे पासून ‘या’ मार्गावर धावणार नवीन एक्सप्रेस, राज्यातील कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार?

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना भारतीय रेल्वेकडून एक मोठी भेट मिळाली आहे. भारतीय रेल्वे कडून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू केली जाणार आहे. ही गाडी राज्यातील काही महत्त्वाच्या स्थानकावर थांबा सुद्धा घेणार आहे.

Published on -

Maharashtra Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक एक गुड न्यूज समोर येत आहे. ती म्हणजे राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी लवकरच एक नवीन एक्सप्रेस सुरू होणार आहे. खरे तर सध्या देशभरातील विविध रेल्वे मार्गांवर प्रवाशांचे अतिरिक्त गर्दी पाहायला मिळत आहे याचे कारण म्हणजे सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि अनेक जण आपल्या मूळ गावाकडे परतत आहे तसेच काही जण पिकनिक साठी बाहेर पडत आहेत.

हेच कारण आहे की रेल्वे कडून अतिरिक्त गाड्या चालवल्या जात आहेत. रेल्वे कडून चालवल्या जाणाऱ्या या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना फायदा मिळतोय. दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता भारतीय रेल्वेने तिरुवनंतपुरम सेंट्रल ते हजरत निजामुद्दीन दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे.

ही गाडी आपल्या महाराष्ट्रातून धावणार आहे यामुळे राज्यातील नागरिकांना जलद गतीने दिल्लीला पोहोचता येणार आहे. राज्यातील नागरिकांचा दिल्लीकडील प्रवास या गाडीमुळे सोयीचा होईल अशी आशा या निमित्ताने व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच ही गाडी कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार याबाबतही माहिती पाहणार आहोत.

कसं राहणार वेळापत्रक ?

रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार तिरुवनंतपुरम सेंट्रल ते हजरत निजामुद्दीन विशेष गाडी (ट्रेन क्रमांक 06633) कोकणातून धावणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरून चालवली जाणारी ही गाडी कोकणातील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार असून ही गाडी 17 मे 2025 रोजी तिरुवनंतपुरम सेंट्रल येथून रवाना झाली आहे.

या एक मार्गी विशेष एक्सप्रेस ट्रेनची फक्त एकच फेरी होणार आहे. ही गाडी 17 मे ला तिरुवनंतपुरम सेंट्रल येथून सकाळी सात वाजून 30 मिनिटांनी रवाना झाल्यानंतर 18 तारखेला कोकणातील रत्नागिरी रेल्वे स्थानकावर येणार आहे.

18 मे रोजी सकाळी सहा वाजता ही गाडी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर पोहोचेल आणि त्यानंतर मग या गाडीचा पुढील प्रवास सुरू होणार आहे. ही गाडी 17 मे ला तिरुवनंतपुरम सेंट्रल येथून रवाना झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावर म्हणजेच दिल्लीला पोहोचणार आहे.

आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनला या मार्गावरील कोणकोणत्या महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आलेला आहे याचा आढावा घेणार आहोत.

विशेष गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबणार?

रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यातील कोकण विभागातील जवळपास चार महत्त्वाच्या स्थानकावर ही गाडी थांबा घेणार आहे.

या गाडीला कोकणातील मडगाव, रत्नागिरी, रोहा, पनवेल आणि वसई रोड येथे थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe