खुशखबर ! मुंबईवरून धावणाऱ्या 2 एक्सप्रेस गाड्यांना राज्यातील ‘या’ Railway स्थानकावर थांबा मंजूर

राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे, महाराष्ट्रातून धावणाऱ्या दोन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना राज्यातीलच एका महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आलेला आहे. मुंबईवरून धावणारी बांद्रा टर्मिनस ते भुज दरम्यानच्या एक्सप्रेस ट्रेनला आणि दादर ते बिकानेरदरम्यानच्या एक्सप्रेस ट्रेनला राज्याच्या एका महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाकडून घेण्यात आलाय. 

Published on -

Mumbai Express Train : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईमधून धावणाऱ्या दोन एक्सप्रेस गाड्यांना राज्यातील एका महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बांद्रा टर्मिनस – भुज यादरम्यान चालवल्या जाणाऱ्या कच्छ एक्सप्रेस आणि दादर – बिकानेर एक्सप्रेस या दोन रेल्वेगाड्यांना राज्यातील एका महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आलेला आहे.

या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर !

बांद्रा टर्मिनस – भुज कच्छ एक्सप्रेस (गाडी क्रमांक 22955/22956) आणि बिकानेर – दादर एक्सप्रेस (गाडी क्रमांक 12489/12490) या दोन एक्सप्रेस गाड्यांना कोकणातील एका महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाने पालघर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी पालघर रेल्वे स्थानकावर या दोन्ही गाड्यांना थांबा मंजूर केलेला आहे.

खरे तर, या दोन्ही गाड्या पालघर रेल्वे स्थानकावर थांबाव्यात अशी मागणी येथील प्रवाशांच्या माध्यमातून सातत्याने उपस्थित केली जात होती आणि याच मागणीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाने या दोन्ही गाड्यांना पालघर रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर केला असून यामुळे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळेल अशी आशा जाणकारांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून?

17 मे 2025 पासून बांद्रा टर्मिनस ते भुज एक्सप्रेस ट्रेनला म्हणजेच कच्छ एक्सप्रेसला पालघर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 22955 ही गाडी पालघर स्थानकात सायंकाळी सात वाजता येणार आहे आणि 22956 ही गाडी पालघर स्थानकात सकाळी नऊ वाजून 34 मिनिटांनी येणार आहे.

बांद्रा टर्मिनस ते भुज दरम्यानच्या एक्सप्रेस ट्रेनला दररोज पालघर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आलेला आहे. दादर बिकानेर एक्सप्रेस ट्रेन बाबत बोलायचं झालं तर 12490 ही गाडी 18 मे पासून रविवारी दुपारी चार वाजून 14 मिनिटांनी पालघर रेल्वे स्थानकात येणार आहे आणि 12489 ही गाडी 21 मे पासून दर बुधवारी सकाळी 11 वाजून बारा मिनिटांनी पालघर रेल्वे स्थानकात येणार आहे.

या गाडीला रविवारी आणि बुधवारी पालघर रेल्वे स्थानकात थांबा राहणार आहे. नक्कीच गेल्या अनेक दिवसांपासूनची पालघर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांची मागणी रेल्वे बोर्डाकडून पूर्ण करण्यात आली असल्याने यामुळे नागरिकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे आणि रेल्वे बोर्डाच्या निर्णयाचा जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. पालघर जिल्ह्यातील नागरिकांना आता जलद गतीने आपला प्रवास पूर्ण करता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe