महाराष्ट्रातील ‘या’ शहरात विमानतळासारखे भव्य बसस्थानक ! 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर

महाराष्ट्राला लवकरच एका नव्या बसस्थानकाची भेट मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या शहरात नवीन विमानतळ सदृश्य बसस्थानक तयार केले जाणार असून या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून पंधरा कोटी रुपयांची तरतूद करून देण्यात आली आहे. प्रकल्पाचा खर्च राज्य शासन स्वतः उचलणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम जलद गतीने पूर्ण होईल आणि ST ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल असे म्हटले जात आहे.

Published on -

Maharashtra ST News : महाराष्ट्रात रेल्वे सोबतच एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. राज्यातील असा एखादाच व्यक्ती असेल ज्याने अजून पर्यंत लाल परीने प्रवास केलेला नाही. दरम्यान लाल परी चा प्रवास वेगवान आणि सोयीचा व्हावा यासाठी एसटी महामंडळाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी विविध मार्गांवर बसेस चालवल्या जात आहेत, नवनवीन बसेस महामंडळात ऍड केल्या जात आहेत. सोबतच नवीन बस स्थानक सुद्धा विकसित केले जात आहेत.

दरम्यान महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या शहरात विमानतळासारखे भव्य असे बस स्थानक तयार होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यात हे विमानतळासारखे भव्य बसस्थानक तयार होणार असून यासाठी जवळपास 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती मार्च महिन्यात समोर आली होती.

महाराष्ट्र राज्य शासनाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सातारा मध्यवर्ती बस स्थानकासाठी 15 कोटी रुपयांची तरतूद करून देण्यात आली असल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली होती.

ते म्हणाले होते की साताऱ्यात आता विमानतळ सदृश्य बसस्थानक विकसित होणार असून यामुळे सातारा मधून एसटी महामंडळाच्या बसेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्य शासन उचलणार खर्च 

शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सांगितल्याप्रमाणे सातारा बसस्थानकाच्या विकासासाठी 15 कोटी रुपयांची तरतूद झालेली आहे. महत्त्वाची बाब अशी की या प्रकल्पासाठी जो खर्च येणार आहे तो सर्व खर्च महाराष्ट्र राज्य शासनाकडून उचलला जाणार आहे. दरम्यान आता एमएसआरडीसी कडून या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

खरंतर शहरात नवीन भव्य बसस्थानक तयार झाली पाहिजे अशी मागणी सातारकरांकडून सातत्याने उपस्थित केली जात होती आणि याच मागणीच्या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून साताऱ्यात नवीन भव्य असे बसस्थानक निर्माण केले जाणार असून या प्रकल्पाचा सर्व खर्च राज्य शासन करणार आहे.

या प्रकल्पाबाबत अधिक माहिती अशी की सातारा शहरात तयार होणाऱ्या, नव्याने बांधण्यात येणाऱ्या बसस्थानकात व्यावसायिकांसाठी जवळपास 13 दुकाने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यामुळे सातारा शहराच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे.

सातारा शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला असून नवीन बसस्थानक तयार झाल्यानंतर येथील पर्यटन, व्यवसाय व शिक्षणासाठी येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढणार आहे. परिणामी साताऱ्याची अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल अशी आशा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News