Bank Of Baroda FD : जर तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असाल आणि एफडी करणार असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण बँक ऑफ बडोदा या सरकारी बँकेच्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत. खरंतर अनेक जण या बँकेत एफडी करण्याच्या तयारीत आहेत.
कारण की या बँकेकडून आपल्या ग्राहकांना अजूनही एफडीवर चांगले व्याज दिले जात आहे. खरंतर गेल्या काही महिन्यांच्या काळात आरबीआय कडून दोनदा रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली.

गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी आरबीआयने रेपो रेट 0.25 टक्क्यांनी कमी केलेत आणि या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा यामध्ये 0.25 टक्क्यांची कपात करण्यात आली. म्हणजेच गेल्या काही महिन्यांच्या काळात आरबीआय कडून रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांची कपात झाली आहे.
यामुळे अनेक बँकांकडून एफडीच्या व्याजदरात सुद्धा कपात करण्यात आली आहे. पण, बँक ऑफ बडोदा 24 महिन्यांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना अजूनही चांगले व्याज ऑफर करते.
अशा परिस्थितीत आज आपण बँक ऑफ बडोदा च्या 24 महिन्यांच्या एफडी योजनेची माहिती जाणून घेणार आहोत तसेच या योजनेत जर एखाद्या ग्राहकाने दहा लाखाची गुंतवणूक केली तर त्याला किती रिटर्न मिळणार याच कॅल्क्युलेशन सुद्धा पाहणार आहोत.
कशी आहे बारा महिन्यांची एफडी योजना?
बँक ऑफ बडोदा या सरकारी बँकेची 24 महिन्यांची एफडी योजना ग्राहकांसाठी फायद्याची आहे. या बँकेच्या दोन वर्षाच्या एचडी योजनेतून ग्राहकांना चांगला परतावा मिळतोय. बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार ही बँक सामान्य ग्राहकांना दोन वर्षांच्या एफडी योजनेत गुंतवणूक केल्यास 6.80% दराने व्याज देत आहे.
तसेच याच दोन वर्षांच्या एफडी योजनेत सीनियर सिटीजन ग्राहकांनी म्हणजेच 60 वर्षांवरील ग्राहकांनी जर गुंतवणूक केली तर अशा ग्राहकांना 7.30% दराने व्याज दिले जात आहे. महत्त्वाची बाब अशी की बँक ऑफ बडोदा कडून याच एफ डी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सुपर सीनियर सिटीजन ग्राहकांना 7.40% दराने व्याज दिले जात आहे.
म्हणजेच ही एफडी योजना सामान्य ग्राहकांच्या तुलनेत सीनियर सिटीजन ग्राहकांसाठी अधिक फायद्याची असून जर तुमच्याही कुटुंबात सीनियर सिटीजन्सच्या नावाने एफडी करायची असेल तर नक्कीच हा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे.
10 लाखाची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार ?
जर समजा एखाद्या सामान्य ग्राहकाने बँक ऑफ बडोदाच्या दोन वर्षांच्या एफडी योजनेत दहा लाखाची गुंतवणूक केली तर त्याला 11 लाख 44 हजार 373 रुपये मिळणार आहेत म्हणजेच एक लाख 44 हजार 373 रुपये त्याला व्याज स्वरूपात रिटर्न मिळतील.
पण जर याच योजनेत सीनियर सिटीजन ग्राहकांनी 10 लाखाची गुंतवणूक केली तर त्यांना 11 लाख 57 हजार 940 रुपये मिळणार आहेत म्हणजेच एक लाख 57,940 रुपये त्यांना व्याज स्वरूपात रिटर्न मिळतील.