Post Office FD Scheme : पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणुकीचा प्लॅन असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरंतर भारतात पहिल्यापासूनच सुरक्षित गुंतवणुकीला विशेष प्राधान्य दाखवले जाते. सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेच्या एफडी योजनांमध्ये तसेच पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते.
पोस्ट ऑफिस कडून वेगवेगळ्या बचत योजना सुरू करण्यात आल्या आहेत. पोस्ट ऑफिस कडून टाईम डिपॉझिट योजना सुद्धा सुरू करण्यात आली आहे. पोस्टाच्या टाईम डिपॉझिट योजनेला पोस्टाची एफडी योजना म्हणूनही ओळखले जाते.

कारण म्हणजे पोस्ट ऑफिसच्या या टीडी योजनेचे स्वरूप अगदीच एफडी योजनेसारखे आहे. पण पोस्टाच्या एफडी योजनेतून गुंतवणूकदारांना चांगले व्याज मिळत आहे. यामुळे बँकांच्या एफडी योजनेपेक्षा पोस्टाच्या एफडी योजनेत गुंतवणूक करण्याला अधिक प्राधान्य दाखवले जाते.
खरंतर आरबीआयने गेल्या काही महिन्यांच्या काळात रेपो रेटमध्ये मोठी कपात केलेली आहे. आरबीआयने गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी आणि या चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला होता.
गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी आरबीआयकडून रेपो रेट 0.25 टक्क्यांनी कमी करण्यात आलेत आणि या चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा रेपो रेट 0.25 टक्क्यांनी कमी झालेत.
म्हणजे अवघ्या काही महिन्यांच्या काळातच आरबीआयकडून रेपोरेट 0.50 टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत आणि याचाच परिणाम म्हणून विविध बँकांच्या एफडी योजनांच्या व्याजदरात कपात झाली आहे.
पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेचे व्याजदर कायम
आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बँकांचे एफडीचे व्याजदर कमी करण्यात आले आहेत, मात्र अजूनही पोस्ट ऑफिसच्या एफडीचे व्याजदर जैसे थे आहेत.
त्यामुळे अनेकजण पोस्टाच्या एफडी योजनेत गुंतवणुकीला प्राधान्य दाखवत आहेत. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्षे आणि पाच वर्ष कालावधीची एफडी योजना ऑफर केली जाते.
यामध्ये एका वर्षाच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 6.9%, दोन वर्षांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सात टक्के, तीन वर्षे एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.10% आणि पाच वर्ष कालावधीच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.50% दराने व्याज दिले जात आहे.
दरम्यान, आता आपण पोस्टाच्या तीन वर्षांच्या FD योजनेत एखाद्या ग्राहकाने एक लाखाची गुंतवणूक केली तर त्याला किती रिटर्न मिळणार याच कॅल्क्युलेशन समजून घेणार आहोत.
1 लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?
सध्या पोस्ट ऑफिसकडून तीन वर्षांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.10% दराने व्याज दिले जात आहे. दरम्यान, पोस्ट ऑफिसच्या एफडी कॅल्क्युलेटरनुसार जर तीन वर्षांच्या एफडी योजनेत 1 लाखाची गुंतवणूक केली तर 7.10% दराने सदर गुंतवणूकदाराला मॅच्युरिटी वर म्हणजेच तीन वर्षांचा काळ पूर्ण झाल्यानंतर एक लाख 23 हजार 508 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच गुंतवणूकदाराला 23,508 रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळतील.