Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस च्या संदर्भात एक मोठे अपडेट हाती आले आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली हाय स्पीड ट्रेन. या गाडीची सुरुवात 2019 मध्ये झाली.
पहिल्यांदा ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. त्यानंतर मग टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू करण्यात आली.

आतापर्यंत देशातील जवळपास सर्वच महत्त्वाच्या राज्यांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आहे. आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्याला आत्तापर्यंत 11 वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळालेली आहे.
दरम्यान, याच 11 पैकी नागपूर ते बिलासपुर या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आले आहे.
नागपूर – बिलासपुर वंदे भारत एक्सप्रेसमध्ये होणार मोठा बदल
नागपूर ते बिलासपुर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे बोर्डाकडून मोठा निर्णय घेतला जाणार आहे. दोन वर्षांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या नागपूर बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डबे जोडण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
खरे तर, दोन वर्षांपूर्वी सुरू झालेली नागपूर – बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस ही उपराजधानी नागपूरमधील पहिलीच वंदे भारत एक्सप्रेस आहे. या गाडीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला होता.
या गाडीचे उद्घाटन उपराजधानी नागपूर येथे संपन्न झाले होते. सुरुवातीला ही गाडी 16 डब्यांची होती. त्यावेळी या गाडीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत होता.
मात्र मध्यंतरी या गाडीला प्रवाशांकडून मिळणारा प्रतिसाद काही प्रमाणात कमी झाला आणि रेल्वेच्या उत्पन्नावर परिणाम झाला परिणामी या गाडीच्या डब्यांची संख्या 8 पर्यंत कमी करण्यात आली. पण आता या गाडीमधील रेल्वे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
नागपूर बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस ने प्रवास करणाऱ्यांची संख्या अलीकडील काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने आता रेल्वे बोर्डाने ही गाडी पुन्हा एकदा सोळा कोचची करण्याचा निर्णय घेतलाये.
कधीपासून लागू होणार नवा निर्णय
नागपूर बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डबे जोडले जाणार आहेत. रेल्वेने नुकताच हा निर्णय घेतलाय आणि याची अंमलबजावणी येत्या नऊ दिवसात होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एक जून 2025 पासून नागपूर बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस ला आणखी आठ डबे जोडण्याचा निर्णय अमलात आणला जाणार आहे. यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून आवश्यक पूर्वतयारी सुरू करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.