Best Engineering Branch : बारावीचा निकाल लागला की विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी लगबग करतात. बारावी सायन्सनंतर अनेकजण इंजीनियरिंग आणि मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतात. दरम्यान यावर्षी बारावीचा निकाल वेळेच्या आधीच लागलाय.
यंदा बारावीचा निकाल 5 मे 2025 रोजी जाहीर करण्यात आला. दरवर्षी बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागत असतो. मात्र यंदा बारावीचा निकाल वेळेच्या आधीच जाहीर करण्यात आला आणि यामुळे पुढील वर्गातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग लवकरच सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दरवर्षी लाखो विद्यार्थी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतात आणि यंदाही अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणार आहेत. अनेकजण मेकॅनिकल, सिविल, केमिकल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग अशा इंजिनिअरिंगच्या प्रमुख ब्रांच मध्ये ऍडमिशन घेतात.
दरम्यान जर तुम्हीही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणार असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख फारच उपयुक्त ठरणार आहे कारण की, आज आपण इंजीनियरिंगच्या अशा एका कोर्सची माहिती जाणून घेणार आहोत, जो कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला इतर कोर्सेस पेक्षा अधिक पगाराची नोकरी मिळणार आहे.
इंजीनियरिंगचा हा कोर्स केल्यास तुमची लाईफ सेट झाली म्हणून समजा
बारावीनंतर तुमचाही इंजीनियरिंगला जाण्याचा प्लॅन असेल आणि जर तुम्ही सिविल, मेकॅनिकल, केमिकल अशा कोर्सेसला ऍडमिशन घेणार असाल तर थांबा. खरंतर हे इंजीनियरिंगचे कोर्सेस आधीच लोकप्रिय आहेत आणि यातून अनेक विद्यार्थी डिग्री कम्प्लीट करतात.
सिविल, मेकॅनिकल, केमिकल अशा कोर्सेस मधून डिग्री कम्प्लीट केल्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी सुद्धा मिळते. पण आज आपण डेटा सायन्स अँड इंजीनियरिंग या कोर्स बाबत जाणून घेणार आहोत. डेटा सायन्स अँड इंजीनियरिंग मधून डिग्री कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी मिळणार आहे.
जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे या कोर्स मधून जर डिग्री कम्प्लीट केली तर विद्यार्थ्यांना सरासरी आठ लाखांपासून ते 22 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळते. Amazon, Deloitte, Wipro अशा नामांकित आणि मल्टिनॅशनल कंपनीज डेटा सायन्स अँड इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात जॉब ऑफर करताना दिसते.
या ब्रांच मधून डिग्री कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला डेटा ऍनालिस्ट, बिजनेस ॲनालिस्ट आणि मशीन लर्निंग इंजिनियर म्हणून नोकरी मिळते. इतर इंजीनियरिंग कोर्सेस पेक्षा हा कोर्स विद्यार्थ्यांसाठी अधिक फायद्याचा राहणार आहे.
कसा आहे कोर्स ?
खरेतर, बीटेक डेटा सायन्स अँड इंजिनिअरिंग हा चार वर्षांचा अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे जो आठ सेमिस्टरमध्ये विभागलेला आहे. हा कोर्स अर्थपूर्ण इनसाईटसाठी डेटा कसा कलेक्ट करायचा, क्लीन करायचा आणि त्याचे विश्लेषण करायचे हे शिकवतो.
बारावीनंतर विद्यार्थ्यांना या इंजिनिअरिंगच्या कोर्सला ऍडमिशन घेता येते. बारावी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकता. डेटा तज्ञांच्या वाढत्या मागणीमुळे, डेटा सायन्समधील बीटेक आता 500 हून अधिक संस्थांमध्ये ऑफर केले जात आहे.
ज्यात शीर्ष आयआयटी आणि एनआयटीचा सुद्धा समावेश असल्याची माहिती जाणकारांकडून देण्यात आली आहे. या कोर्सची फी ही साधारणता 6000 रुपयांपासून ते 24 लाख रुपयांपर्यंत आहे.
सरकारी शैक्षणिक संस्थेत या कोर्सची फी कमी असते मात्र प्रायव्हेट मध्ये ही फी फार अधिक आहे. डेटा सायन्समधील हा अभियांत्रिकी अभ्यासक्रम मोठ्या डेटासेट हाताळण्यावर आणि त्यातून उपयुक्त माहिती काढण्यावर लक्ष केंद्रित करतो.