आनंदाची बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला, किती वाढला DA ? पहा…

राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत आहेत. खरेतर, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नुकताच 55% इतका करण्यात आला असून आता राज्यातील काही कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा 55% एवढा करण्याचा निर्णय घेण्यात आलाये.

Published on -

DA Hike : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नुकत्याच काही महिन्यांपूर्वी सुधारित करण्यात आला आहे. होळी नंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला. या डीएवाढीनंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55% इतका झाला आहे.

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू झाली आहे. तसेच, केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढल्यानंतर देशभरातील विविध राज्यांमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा सुधारित केला जातोये. आतापर्यंत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, तामिळनाडू अशा राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित करण्यात आला आहे. या संबंधित राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा 55% झाला असून ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू झाली आहे.

दुसरीकडे महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा 55% इतका करण्यात आला आहे. अशातच आता महाराष्ट्रात राज्यातील काही कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे ती म्हणजे काही कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्राच्या धर्तीवर सुधारित करण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय काल 20 मे 2025 रोजी घेण्यात आला आहे. दरम्यान, आता आपण या निर्णयानंतर राज्यातील कोणत्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला ? याबाबतचा आढावा घेणार आहोत.

या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता झाला 55%

महाराष्ट्र राज्यातील मुंबई महापालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्राच्या धर्तीवर 53% वरून 55% इतका करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी 2025 पासून सुधारित करण्यात आला असून मे महिन्याच्या पगारांसोबत या संबंधित कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळणार आहे. महागाई भत्ता वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असल्याने महापालिकेतील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे.

मुंबई महापालिकेतील कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार महागाई भत्ता वाढीचा लाभ

मिळालेल्या माहितीनुसार, महानगरपालिका समय वेतनश्रेणीतील पूर्णकालिक कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारक, वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवर्गातील कर्मचारी, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेतनश्रेणीत वेतन घेणारे अध्यापकीय कर्मचारी यांना जानेवारी महिन्यापासूनच्या महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. या संबंधित कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% इतका होईल. पण, महापालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या माध्यमिक शाळा संहितेनुसार वेतन अनुज्ञेय असणाऱ्या माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. म्हणजे त्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार नाही असे सुद्धा महापालिकेच्या प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News