Mumbai News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. राज्यात अनेक महामार्गांची कामे गेल्या दहा पंधरा वर्षांच्या काळात पूर्ण झाली आहेत आणि यामुळे राज्यातील रस्ते कनेक्टिव्हिटी फारच उत्कृष्ट बनलीये.
तर दुसरीकडे राज्यात असेही काही प्रकल्प आहेत ज्यांची कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत. असाच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प. या प्रकल्पाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखले आहे.

यामुळे मुंबई ते कोकण हा प्रवास फारच आव्हानात्मक बनला आहे. पण आता मुंबई ते कोकण हा प्रवास वेगवान होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील माझगावपासून आता कोकणासाठी नवीन जलवाहतूक सेवा सुरू केली जाणार आहे.
यासाठी राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेतला. येत्या गणपती उत्सवाच्या काळात फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे चाकरमान्यांना समुद्रमार्गे कोकणात प्रवास करता येणार आहे. यामुळे मुंबई ते रत्नागिरी हा प्रवास अवघ्या तीन तासात पूर्ण होईल असा दावा केला जातोय.
कोकणातील या शहरापर्यंत जलवाहतूक सुरू होणार
मिळालेल्या माहितीनुसार राजधानी मुंबईतील माझगावपासून कोकणातील मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू केली जाणार आहे. यामुळे मुंबई ते मालवण आणि विजयदुर्ग पर्यंतचा प्रवास अवघ्या चार ते साडेचार तासांच्या काळात पूर्ण होणार आहे.
तर दुसरीकडे मुंबई ते रत्नागिरी हा प्रवास अवघ्या तीन तासांच्या काळात पूर्ण होईल असे बोलले जात आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही जलवाहतूक सेवा सुरू केली जाणार असून हायटेक यंत्रणा असलेल्या एम टू एम या बोटीमार्फत कोकणात प्रवास करता येणार अशी माहिती संबंधितांकडून प्राप्त झाली आहे.
येत्या तीन दिवसांनी म्हणजेच 25 मे 2025 रोजी एम टू एम बोट मुंबईतील भाऊचा धक्का येथे दाखल होणार असल्याची माहिती हाती आलीये. ही बोट सेवा सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर चालू केले जाणार आहे.
या बोट सेवेचे तिकीट दर हे सुद्धा चाकरमान्यांना परवडतील असेच राहणार आहेत. अजून या जलवाहतूक सेवेचे तिकीट दर निश्चित झालेले नाहीत मात्र लवकरच हे दर निश्चित केले जातील आणि त्यानंतर सेवा सुरू होईल अशी माहिती हाती आली आहे.
यामुळे मुंबई ते कोकण हा प्रवास वेगवान होणार आहे. मुंबईहून कोकणात जाण्यासाठी प्रवासाचा एक नवीन पर्याय या निमित्ताने उपलब्ध होणार आहे.