‘ही’ आहे देशातील सर्वात बेस्ट सरकारी शाळा ! इथून शिक्षण घेतल्यास लाईफ सेट होणार

तुम्हीही तुमच्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी बेस्ट गव्हर्मेंट शाळेच्या शोधात आहात का? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण देशातील सर्वोत्कृष्ट सरकारी शाळेची माहिती पाहणार आहोत.

Published on -

Best Government School : सध्या राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना सुट्ट्या आहेत. गेल्या महिन्यापासून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष आता 15 जून पासून सुरू होणार आहे.

शैक्षणिक वर्ष 2025 26 ची सुरुवात 15 जून पासून होणार आणि प्रत्यक्षात 16 जून पासून शाळेचे वर्ग भरणार आहेत. खरे तर सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहे मात्र पालक आपल्या मुलांसाठी चांगल्या शाळेच्या आणि कॉलेजच्या शोधात आहेत.

खरंतर, आजकाल कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्यासाठी चांगले शिक्षण खूपच महत्वाचे बनले आहे. कारण की, आता प्रत्येकच क्षेत्रात जबरदस्त कॉम्पिटिशन पाहायला मिळत आहे अन म्हणूनच या स्पर्धात्मक युगात चांगल्या शाळेतून आणि कॉलेजमधून शिक्षण घेणे अनिवार्य बनले आहे.

कारण जर मुलांचा पाया मजबूत असेल तर ते नक्कीच चांगले भविष्य घडवू शकतात. मात्र हे तितकेच खरे असेल तरी देखील अलीकडे शिक्षण फारच महाग बनले आहे.

त्यामुळे अनेक जण सरकारी शाळेत आपल्या मुलांना शिकवतात. अशा परिस्थितीत आज आपण देशातील सर्वोत्कृष्ट सरकारी शाळेची माहिती जाणून घेणार आहोत.

ही आहे देशातील सर्वात बेस्ट सरकारी शाळा 

खरं तर महाराष्ट्रात आणि देशात सरकारी शाळांची स्थिती दयनीय बनली आहे. अनेक सरकारी शाळा पटसंख्या कमी असल्याच्या कारणांनी बंद करण्यात आल्या आहेत. पण सर्वच सरकारी शाळांची स्थिती आपण पाहिल्याप्रमाणे नाही.

देशात काही शाळा अशा आहेत ज्या कमी बजेटमध्ये मुलांना शिक्षण देतात आणि सरकारच्या अंतर्गत चालवल्या जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सरकारी शाळेबद्दल सांगत आहोत जिथे तिथे शिकणाऱ्या प्रत्येक मुलाचे आयुष्य चांगले घडते.

या शाळेची फी खाजगी शाळांच्या तुलनेत खूपच कमी आहे आणि तुम्ही तुमच्या मुलांना येथे सहज प्रवेश मिळवून देऊ शकता. जवाहर नवोदय शाळा ही देशातील सर्वोच्च सरकारी शाळांपैकी एक आहे.

ही शाळा उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी ओळखली जाते आणि येथे शिकणाऱ्या प्रत्येक मुलाचे आयुष्य घडते. या शाळेतून मुलांनी शिक्षण घेतल्यास त्यांचे करिअर सेट झाले म्हणून समजा.

येथे अभ्यासासोबतच इतर भरपूर ऍक्टिव्हिटीज केल्या जातात, यामुळे येथून शिक्षण घेणारे मुलं खऱ्या अर्थाने अष्टपैलू बनतात. म्हणूनच पालक नवोदय विद्यालयातून आपल्या पाल्यांनी शिक्षण घ्यावे असे स्वप्न पाहतात आणि यासाठी आपल्या पाल्यांना प्रेरित करतात.

ऍडमिशन कसे करणार?

जर जवाहर नवोदय विद्यालयात तुम्हाला तुमच्या मुलांचे ऍडमिशन करायचे असेल तर तुम्ही या विद्यालयात तुमच्या मुलांना सहावी, नववी आणि अकरावीच्या वर्गात प्रवेश देऊ शकता. पण या शाळेत ऍडमिशन घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांना एक छोटीशी टेस्ट द्यावी लागते. या सिलेक्शन टेस्टमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांनाच इथे प्रवेश मिळतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News