Maharashtra Railway News : मुंबईसह महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईवरून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबईमधील रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे.
ही नवीन एक्सप्रेस ट्रेन महाराष्ट्र आणि राजस्थान या दोन राज्यांना कनेक्ट करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही नवीन एक्सप्रेस ट्रेन मुंबई ते बिकानेर दरम्यान चालवली जाईल.

महत्त्वाची बाब अशी की आज 22 मे 2025 रोजी या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला असून पुढील आठवड्यापासून ही गाडी प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.
यामुळे मुंबईहून राजस्थानला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच राजस्थान म्हणून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
1213 किलोमीटर अंतरावर धावणार नवीन एक्सप्रेस
मुंबई – बिकानेर एक्सप्रेस ही 1213 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर थांबणार आहे. ही एक्सप्रेस ट्रेन मुंबईतील वांद्रे टर्मिनस ते राजस्थान मधील बिकानेर दरम्यान चालवली जाणार असून या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास ही गाडी 23 तास आणि 25 मिनिटात पूर्ण करणार आहे.
व्यवसायिक सेवा कधी सुरू होणार?
मुंबई बिकानेर एक्सप्रेस ट्रेन सर्वसामान्य प्रवाशांसाठी पुढील आठवड्यात सुरू केली जाणार आहे. आज 22 मे रोजी या गाडीचा औपचारिक शुभारंभा झाला.
आता बिकानेर-वांद्रे टर्मिनस एक्सप्रेसचे नियमित व्यावसायिक परिचालन पुढील आठवड्यात सुरू होणार अशी खात्रीलायक बातमी रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवलेल्या मुंबई बिकानेर एक्सप्रेस ट्रेन मुळे प्रवाशांना पश्चिम राजस्थान आणि मुंबई दरम्यान सोयीस्कर आणि परवडणारा प्रवास पर्याय उपलब्ध होईल असा विश्वास जाणकारांकडून व्यक्त होतोय. आता आपण ही गाडी कोणकोणत्या स्थानावर थांबा घेणार याची माहिती पाहणार आहोत.
कोणकोणत्या स्थानकावर थांबणार नवीन एक्सप्रेस
मिळालेल्या माहितीनुसार वांद्रे टर्मिनस ते बिकानेर ही नवीन एक्सप्रेस ट्रेन देशनोके, नोखा, नागौर, मेरता रोड जंक्शन, जोधपूर, पाली मारवाड, मारवाड जंक्शन, फालना, अबू रोड, पालनपूर, महेसाणा, साबरमती बीजी, नाडियाद, आनंद, वडोदरा, भरूच, सुरत, वापी आणि बोरिवली या महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे.