50 वर्षानंतर दशांक योग ! ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश

येत्या काही दिवसांनी बुध आणि गुरु ग्रहाच्या संयोगाने दशांक योग तयार होणार आहे. हा योग तब्बल 50 वर्षानंतर तयार होईल आणि यामुळे राशीचक्रातील काही राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे.

Published on -

Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार बुध आणि गुरु हे नवग्रहातील दोन महत्त्वाचे ग्रह आहेत. यामुळे जेव्हा केव्हा या ग्रहांचे राशी गोचर आणि नक्षत्र गोचर होते तेव्हा याचा मानवी जीवनावर थेट सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पाहायला मिळतो.

ज्योतिषशास्त्र असे म्हणते की नवग्रहातील प्रत्येकच ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतो. यांच्या राशी आणि नक्षत्र परिवर्तनानंतर काही खास योग सुद्धा तयार होतात.

दरम्यान बुध आणि गुरु ग्रह आता दशांक योग तयार करणार आहे. ज्योतिष तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा बुध आणि गुरु ग्रह एकमेकांपासून 36 अंशाच्या कोनात येतात तेव्हा हा अद्भुत योग तयार होतो आणि तब्बल अर्धा शतकानंतर म्हणजेच 50 वर्षानंतर हा योग आता तयार होतोय.

त्यामुळे याचा राशी चक्रातील विविध राशीच्या लोकांवर मोठा सकारात्मक प्रभाव पाहायला मिळणार आहे. या राशीच्या लोकांचे वाईट दिवस आता संपतील आणि नव्या सुवर्णकाळाला सुरुवात होणार आहे.

या राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश 

मिथुन : या राशीसाठी हा योग लाभाचा राहणार आहे. आगामी काळ या राशीच्या लोकांच्या उत्पन्नवाढीसाठी लाभदायक ठरणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या लोकांना नोकरी बदलायची असेल तर हा काळ फारच अनुकूल राहणार आहे.

या लोकांना या काळात प्रमोशनची सुद्धा भेट मिळू शकते. तसेच, या राशीच्या लोकांसाठी मालमत्तेचे व्यवहार फायदेशीर ठरतील. शिवाय, सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक तसेच बचतीच्या दृष्टीकोणातून सुद्धा हा काळ अनुकूल राहणार आहे.

कन्या : ज्योतिष तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे मिथुन राशीच्या लोकांप्रमाणेच कन्या राशीच्या लोकांनाही या काळात चांगला लाभ मिळणार असून दशांक योगामुळे या राशीच्या व्यक्तींमध्ये या काळात धैर्य आणि शौर्य वाढणार आहे.

नवीन वाहन तसेच मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहेत. एवढेच नाही तर या काळात देश-विदेश प्रवासाचे योग सुद्धा बनत आहेत. हे लोक करिअरमध्ये चांगली प्रगती करताना दिसतील. या काळात वैवाहिक जीवन विशेष आनंदी राहणार आहे. 

मकर : मिथुन आणि कन्या राशि प्रमाणेच मकर राशीच्या लोकांसाठी सुद्धा हा काळ फारच अनुकूल राहणार आहे. या लोकांचा वाईट काळ खऱ्या अर्थाने आता संपेल आणि नवीन सुवर्णकाळाला सुरुवात होईल.

या काळात व्यवसायात आणि नोकरीत चांगली नेत्र दीपक प्रगती होताना दिसेल. नवीन इन्कम सोर्स सापडतील आणि यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. समाजात मान – सन्मान वाढणार आहे. या काळात या लोकांचा सेल्फ कॉन्फिडन्स फारच वाढेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News