7th Pay Commission : जर तुम्हीही शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारातून कोणी सरकारी नोकरदार म्हणून सेवा देत असेल तर ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. कारण की आता केंद्र सरकारने सातवा वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे.
सरकारने 30 जून किंवा 31 डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढणार आहे. यामुळे संबंधितांना दिलासा मिळेल अशी आशा आहे.

या संदर्भात केंद्राच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या (DoPT) माध्यमातून नवीन आदेश काढण्यात आले आहेत. या नवीन आदेशानुसार, अशा कर्मचाऱ्यांना आता काल्पनिक वाढीचा (National Increment Policy) लाभ मिळणार आहे.
दरम्यान या काल्पनिक वाढीमुळे त्यांच्या पेन्शनमध्ये सुद्धा वाढ होणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वार्षिक वेतनवाढीच्या तारखेच्या एक दिवस आधी म्हणजेच वेतनवाढीच्या तारखेच्या आधी जे लोक निवृत्त होतील त्यांच्या पेन्शनच्या गणनेसाठी आता ही काल्पनिक वाढ लागू केली जाईल.
काय आहे DOPT चा नवीन आदेश?
डीओपीटीच्या नवीन आदेशानुसार, जर एखादा कर्मचारी वार्षिक इन्क्रिमेंटच्या म्हणजेच वेतनवाढीच्या फक्त एक दिवस आधी निवृत्त झाला तर त्याला इन्क्रिमेंटचा लाभ मिळणार आहे.
म्हणजे जो सरकारी कर्मचारी 30 जून किंवा 31 डिसेंबर रोजी निवृत्त झाला म्हणजेच 1 जुलै किंवा 1 जानेवारी या इन्क्रिमेंटच्या दिवसाच्या एक दिवस आधी निवृत्त झाला, तर त्याला वेतनवाढ गमवावी लागणार नाही.
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिल जाणार वाढीव वेतन आणि महागाई भत्ता (डीए) दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्याच्या पहिल्या महिन्यापासून लागू होतो, जरी तो नंतर जाहीर केला गेला तरीही. या बदलामुळे अशा कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळता येणार अशी माहिती जाणकारांकडून देण्यात आली आहे.
या कर्मचाऱ्यांना मिळणार हा लाभ
आम्ही आपणास सांगू इच्छितो की याआधी वेतन वाढीच्या एक दिवस आधी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगारवाढीचा लाभ मिळत नव्हता. परंतु आता सरकारने अशा कर्मचाऱ्यांनाही पेन्शन मोजताना पगारवाढीचा लाभ दिला जाईल.
पण हा लाभ फक्त पेन्शनसाठी असेल आणि त्याचा ग्रॅच्युइटी किंवा इतर निवृत्ती लाभांवर परिणाम होणार नाही असे देखील यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा पूर्ण आणि समाधानकारक झाली आहे त्यांनाच हा लाभ दिला जाईल.
काल्पनिक वेतनवाढीचा वापर फक्त पेन्शन मोजणीसाठी केला जाईल. याचा निवृत्तीशी संबंधित इतर लाभांवर परिणाम होणार नाही. नक्कीच येणार नाही यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.