Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेने सुरू केलेली देशातील स्वदेशी बनावटीची पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन. ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये रुळावर धावताना दिसली होती. सर्वात आधी ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली.
यानंतर मग टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली. सध्या ही गाडी देशातील अनेक राज्यांमध्ये धावत आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्याला आत्तापर्यंत 11 वंदे भारत गाड्यांची भेट मिळालेली आहे.

राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते जालना, सी एस एम टी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते मडगाव, नागपूर ते बिलासपुर, नागपुर ते इंदोर,
नागपुर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. दरम्यान, या 11 मार्गांपैकी एका मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे तिकीट दर हे देशात सर्वाधिक आहे.
या वंदे भारत एक्सप्रेस चे तिकीट दर सर्वाधिक
वंदे भारत एक्सप्रेस ही नेहमीच चर्चेत राहते. खरंतर ही भारतातील सर्वाधिक लक्झरीयस आणि प्रीमियम एक्सप्रेस ट्रेन आहे. या गाडीमध्ये वर्ल्ड क्लास सोयी सुविधा उपलब्ध आहेत.
मात्र या गाडीचे तिकीट दर हे फारच अधिक असून सर्वसामान्यांना परवडत नाही. दरम्यान देशातील सर्वात महागडी वंदे भारत ट्रेन आपल्या महाराष्ट्रातून धावते.
महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांना कनेक्ट करणारी वंदे भारत ट्रेन देशातील सर्वात महागडी वंदे भारत आहे. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोवा येथील मडगाव दरम्यान ही वंदे भारत ट्रेन धावते.
या गाडीचे तिकीट दर हे इतर वंदे भारत एक्सप्रेस पेक्षा अधिक आहे. यामुळे ही गाडी देशातील सर्वाधिक महागडी वंदे भारत ट्रेन असल्याचा दावा केला जातो.
सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे तिकीट दर कसे आहेत
सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्सप्रेसचे एक्झिक्यूटिव्ह चेअर कारचे तिकीट दर 3115 रुपये इतके आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव या दोन्ही स्थानकांमधील अंतर 765 किलोमीटर इतके असून ही ट्रेन हा प्रवास सात तास आणि 45 मिनिटात पूर्ण करते.
या ट्रेनच्या एक्झिक्यूटिव्ह चेअर कार मधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 3115 रुपये एवढे तिकीट द्यावे लागते. ही ट्रेन सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून पाच वाजून पंचवीस मिनिटांनी सोडली जाते आणि गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकावर ही गाडी 13:10 वाजता पोहोचते.