‘ही’ आहेत महाराष्ट्रातील सर्वात बेस्ट इंजीनियरिंग कॉलेज ! मुंबई, पुणे अन नागपूरच्या या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं तर लाईफ सेट होणार

तुम्हीही नुकतेच बारावी उत्तीर्ण झाला आहात आणि इंजीनियरिंगसाठी इंट्रान्स एक्झाम दिलेली आहे का? मग आजची बातमी तुमच्या कामाची आहे. कारण आज आपण मुंबई, पुणे, नागपूरच्या इंजीनियरिंग कॉलेजची माहिती पाहणार आहोत.

Published on -

Top Engineering College : 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर इंजीनियरिंग करायचे असे स्वप्न अनेकांनी पाहिले असेल. दरम्यान जर तुम्हालाही बारावीनंतर इंजीनियरिंग करायची असेल तर तुमच्यासाठी आज चालेल कामाचा राहणार आहे.

आज आपण मुंबई, पुणे आणि नागपूर मधील नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती पाहणार आहोत. खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राची बोर्डाने बारावीचा निकाल जाहीर केला आहे आणि आता विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी लगबग करत आहेत.

अनेक विद्यार्थ्यांनी MHT CET आणि JEE ही प्रवेश परीक्षा दिलेली आहे आणि ते इंजीनियरिंग ला ऍडमिशन घेणार आहेत. खरतर महाराष्ट्रात शेकडो इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. पण आज आपण यापैकी टॉप पाच इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती जाणून घेणार आहोत.

ही आहेत महाराष्ट्रातील टॉप पाच इंजिनिअरिंग कॉलेजेस

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे : शिक्षणाचे माहेरघर म्हणून ख्यातनाम असणाऱ्या पुण्यातील हे इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये फारच लोकप्रिय आहे.

या ठिकाणी संरक्षणासंबंधी तंत्र शिक्षण दिले जाते. या शैक्षणिक संस्थेचा कारभार भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयातील संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत येतो.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई : आयआयटी मुंबई ही देशातील एक नामांकित शैक्षणिक संस्था हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे इंजिनिअरिंग कॉलेज. या कॉलेजचे कॅम्पस फारच छान आहे आणि इथे अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

देश विदेशातील विद्यार्थी येथून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतात. त्यामुळे जर तुम्हाला मुंबईतून इंजीनियरिंग करायची असेल तर तुम्ही या कॉलेजला प्राधान्य देऊ शकता.

विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (व्हीएनआयटी) : उपराजधानी नागपूर येथील हे इंजिनिअरिंग कॉलेज संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. पूर्वी या कॉलेजला विश्वेश्वरय्या रिजनल कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग या नावाने ओळखले जात होते. जर तुम्हाला नागपूर मध्ये शिक्षण घ्यायचे असेल तर तुम्ही या कॉलेजला प्राधान्य देऊ शकता.

अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे : या महाविद्यालयाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात जुने अभियांत्रिकी महाविद्यालय आणि महाराष्ट्रातील पहिलेच अभियांत्रिकी महाविद्यालय आहे.

तुम्हाला जर पुण्यातून इंजीनियरिंग करायची असेल तर तुम्ही या कॉलेजला नक्कीच प्राधान्य दिले पाहिजे. या ठिकाणी देश-विदेशातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

ICT मुंबई : हे महाराष्ट्रातील एक अभिमत विद्यापीठ आहे. राज्यातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये याचा समावेश होतो. म्हणून जर तुम्हाला इंजिनिअरिंगचे शिक्षण घ्यायचे असेल तर तुम्ही आयसीटी मुंबई या कॉलेजला प्राधान्य देऊ शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News