Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने बदलत आहेत. कधी सोन्याचा किमती वाढतात तर कधी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण सुद्धा होते. दरम्यान आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत मोठी घसरण नमूद करण्यात आली आहे.
खरंतर तीन दिवसांपूर्वी अर्थातच 23 मे 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 380 रुपयांनी कमी होऊन 97 हजार 530 रुपयांवर आली, याच दिवशी 22 कॅरेट सोन्याची किंमत 350 रुपयांनी कमी होऊन 89,400 रुपयांवर आली.

मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे 24 मे ला 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 550 रुपयांनी वाढवून 98 हजार 80 रुपयांवर पोहोचली आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत पाचशे रुपयांनी वाढ होणे 89 हजार 900 रुपयांवर पोहोचली.
काल अर्थातच 25 मे 2025 रोजी मात्र सोन्याच्या किमतीत कोणताच बदल झाला नाही, काल सोन्याच्या किमती स्थिर राहिल्यात यामुळे आज काय होणार? 26 मे 2025 रोजी सोन्याच्या किमतीचा ट्रेंड नेमका कसा असेल? याबाबत सर्वसामान्य ग्राहकांसहित गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता पाहायला मिळाली. मात्र आज सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण नमूद करण्यात आली आहे.
किती घसरल्यात सोन्याच्या किमती ?
22 कॅरेट : मिळालेल्या माहितीनुसार, आज 26 मे रोजी 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत दहा ग्रॅम मागे 400 रुपयांची घसरण झाली आहे.
24 कॅरेट : आज 26 मे रोजी 22 कॅरेट सोन्याच्या तुलनेत 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत अधिक घसरन झाली आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत तब्बल 440 रुपयांनी कमी झाली आहे.
18 कॅरेट : 22 आणि 24 कॅरेट सोन्याप्रमाणेच 18 कॅरेट सोन्याच्या किमतीतही आज बदल झालाये. आज 18 कॅरेट सोन्याची किंमत दहा ग्रॅम मागे 330 रुपयांनी कमी झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे रेट
22 कॅरेट सोन्याचे आजचे भाव : महाराष्ट्रातील मुंबई पुणे नागपूर ठाणे कोल्हापूर जळगाव या शहरांमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 500 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे. तसेच नाशिक, वसई विरार, भिवंडी आणि लातूर या शहरांमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 89,530 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.
18 कॅरेट सोन्याचे आजचे भाव : महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या शहरांमध्ये आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 230 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे. तसेच नाशिक, वसई विरार, भिवंडी आणि लातूर या शहरांमध्ये आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73,260 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.
24 कॅरेट सोन्याचे भाव : महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या शहरांमध्ये आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 640 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे. तसेच नाशिक, वसई विरार, भिवंडी आणि लातूर या शहरांमध्ये आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 97,670 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.