HDFC बँकेच्या 90 दिवसांच्या FD योजनेत 9 लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ? वाचा सविस्तर

HDFC ही आरबीआयने घोषित केलेली देशातील सर्वाधिक सुरक्षित प्रायव्हेट बँक. दरम्यान जर तुम्हाला एचडीएफसीमध्ये एफडी करायची असेल तर आजची बातमी कामाची राहणार आहे.

Published on -

HDFC Bank FD : एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक म्हणून ओळखली जाते. ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते, सोबतच FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सुद्धा बँकेकडून चांगले व्याजदर ऑफर केले जात आहे.

खरंतर, अलीकडे देशातील विविध बँकांकडून एफडीच्या व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारण म्हणजे आरबीआयचा एक महत्त्वाचा निर्णय. रिझर्व बँक ऑफ इंडियाने गेल्या काही महिन्यांमध्ये रेपो दरात 0.50 टक्क्यांची कपात केलेली आहे.

आरबीआयने गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात केली आणि या चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा 0.25% कपात करण्यात आली. याचाच परिणाम म्हणून एचडीएफसीसह सर्वच बँकांनी विविध कर्जाच्या व्याजदरात कपात केली आणि एफडी व्याजदरात सुद्धा कपात केलेली आहे.

दरम्यान, आता आपण एफडी व्याजदरात कपात करण्याचा निर्णय झाल्यानंतर एचडीएफसी बँकेच्या 90 दिवसांच्या एफडी योजनेची तपशीलवार माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

एचडीएफसीची 90 दिवसांची एफडी योजना कशी आहे ?

खरे तर, एचडीएफसी बँक आपल्या ग्राहकांना सात दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीची FD योजना ऑफर करत आहे. ही बँक तीन महिन्यांची म्हणजेच 90 दिवसांची एफडी योजना सुद्धा ऑफर करते.

देशातील सर्वात मोठ्या प्रायव्हेट बँकेकडून 90 दिवसांच्या FD योजनेवर आपल्या सामान्य ग्राहकांना म्हणजेच ज्या लोकांचे वय 60 वर्षांपेक्षा कमी आहे त्या लोकांना 4.50% दराने व्याज दिले जात आहे.

दुसरीकडे, 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या लोकांना एचडीएफसी कडून 90 दिवसांच्या FD योजनेत गुंतवणूक केल्यास पाच टक्के दराने व्याज दिले जात आहे.

दरम्यान आता आपण एचडीएफसीच्या तीन महिन्यांच्या एफडी योजनेत 9 लाखांची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार? याचे कॅल्क्युलेशन समजून घेणार आहोत.

9 लाखाच्या गुंतवणुकीवर किती रिटर्न मिळणार?

जर एखाद्या ग्राहकाने एचडीएफसी बँकेच्या तीन महिन्यांच्या एफडी योजनेत म्हणजेच 90 दिवसांच्या एफडी योजनेत नऊ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना 4.50% व्याजदरानुसार नऊ लाख नऊ हजार 986 रुपये मिळणार आहेत म्हणजेच 9 हजार 986 संबंधित ग्राहकाला व्याज म्हणून रिटर्न मिळतील.

दुसरीकडे, याच तीन महिन्यांच्या एफडी योजनेत 60 वर्षांवरील नागरिकांनी नऊ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना पाच टक्के व्याजदरानुसार नऊ लाख 11 हजार 95 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच 11,095 रुपये व्याज म्हणून रिटर्न मिळणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News