16 जून पासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रातील शाळांना किती दिवस सुट्ट्या राहणार ?

महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष पुढील महिन्यात सुरू होणार आहे. 16 जून 2025 पासून शैक्षणिक वर्ष 2025 - 26 ची सुरुवात होणार आहे. म्हणून आता आपण नव्या शैक्षणिक वर्षात शाळांना किती दिवस सुट्ट्या राहणार ? याची माहिती पाहणार आहोत.

Published on -

Maharashtra Schools : सध्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या लागलेल्या आहेत. त्यामुळे काही विद्यार्थी उन्हाळी सुट्ट्या एन्जॉय करत आहेत आणि काही विद्यार्थी अतिरिक्त क्लासेस लावून पुढील वर्गासाठी तयारी करत आहे. दरम्यान विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

सीबीएससी बोर्डाच्या शाळा 9 जून पासून सुरु होणार आहेत तर महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा 16 जून पासून सुरू होतील. दरम्यान राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक वर्ष 15 जून 2025 पासून सुरू होणार आहे.

अशा परिस्थितीत आता आपण नव्या शैक्षणिक वर्षाच्या म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2025 – 26 च्या पहिल्या सत्रात अर्थातच 16 जून 2025 ते 16 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राज्यातील शाळांना किती दिवस सुट्ट्या राहणार ? याचा आढावा घेणार आहोत.

नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रात किती दिवस सुट्ट्या राहणार ?

महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांना नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रात म्हणजेच 16 जून ते 16 ऑक्टोबर या कालावधीत अनेक दिवस सुट्ट्या राहतील. या कालावधीत अनेक सण साजरे होणार आहेत आणि या सणांच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्ट्या राहणार आहेत. 

6 जुलै : या दिवशी मोहरम निमित्ताने महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांना सुट्टी राहणार आहे.

15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन असल्याने या दिवशी महाराष्ट्र राज्य बोर्ड शाळांना सुट्टी राहणार आहे.

15 ऑगस्ट : पारसी नववर्ष निमित्ताने महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांना सुट्टी राहणार आहे.

27 ऑगस्ट 2025 : या दिवशी गणेश चतुर्थीचा सण राहणार आहे आणि यामुळे राज्य बोर्डाच्या सर्वच शाळांना या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

5 सप्टेंबर : ईद-ए-मिलाद निमित्ताने महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांना या दिवशी सुट्टी राहील.

2 ऑक्टोबर 2025 : राष्ट्रपिता महात्मा गांधीजी जयंती दिनानिमित्ताने या दिवशी महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या सर्वच शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

2 ऑक्टोबर 2025 : या दिवशी विजयादशमीचा सण साजरा होणार आहे आणि यामुळे महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या सर्वच शाळांना या दिवशी सुट्टी राहील.

16 ऑक्टोबर 2025 : 16 ऑक्टोबर पासून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्ट्या लागणार आहेत.

नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 मध्ये किती दिवस सुट्ट्या राहणार?

नोव्हेंबर महिन्यात एक दिवस आणि डिसेंबर महिन्यात एक दिवस फेस्टिवल हॉलिडे राहणार आहे. पाच नोव्हेंबर 2025 रोजी गुरुनानक जयंती निमित्ताने महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांना सुट्टी राहणार आहे. तसेच 25 डिसेंबर 2025 रोजी ख्रिसमस म्हणजेच नाताळ निमित्ताने महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या सर्वोच्च शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!