Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. 5 मे 2025 रोजी राज्य बोर्डाने बारावीचा निकाल जाहीर केला आणि त्यानंतर आठ दिवसांनी म्हणजेच 13 मे 2025 रोजी राज्य बोर्डाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आता पुढील प्रवेशासाठी लगबग करताना दिसत आहेत. अकरावीच्या ऍडमिशन ची प्रोसेस देखील नुकतीच सुरू झाली आहे. दरम्यान, जर तुम्हीही शैक्षणिक वर्ष 2024 – 25 मध्ये दहावी उत्तीर्ण झाला असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी फारच कामाची ठरणार आहे.

खरंतर, दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून एक विशेष योजना सुरू करण्यात आली आहे जे अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट दिले जात आहे. दरम्यान आता आपण याच योजनेच्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कशी आहे योजना ?
मिळालेल्या माहितीनुसार दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून महाज्योती योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता 10वी मध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना टॅब व नेट सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
एवढ्याच नाही तर JEE / NEET / MHT – CET परीक्षासाठी मोफत प्रशिक्षण सुद्धा दिले जाणार आहे. यामुळे बारावी सायन्स नंतर इंजीनियरिंग आणि मेडिकल फील्डला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले प्रशिक्षण मिळू शकणार आहे.
या योजनेचा लाभ फक्त आणि फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती – भटक्या जमाती त्याचबरोबर विशेष मागास प्रवर्ग मधील विद्यार्थ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे.
म्हणजेच नॉन क्रिमीलेअर गटातील विद्यार्थ्यांनाच याचा फायदा दिला जाणार आहे. शैक्षणिक वर्ष 2024 25 मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच फक्त याचा लाभ मिळणार आहे.
तसेच याचा लाभ जे विद्यार्थी सायन्स मध्ये ऍडमिशन घेतील त्यांनाच मिळणार आहे. दरम्यान या योजनेसाठी विद्यार्थ्यांची निवड ही दहावीच्या टक्केवारीनुसारच केली जाणार आहे.
योजनेसाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना आधार कार्ड, रहिवासी दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेअर, 10 वी चे गुणपत्रक, 11 वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचे बोनाफाईट व ऍडमिशनची स्लिप, दिव्यांग / अनाथ असल्यास प्रमाणपत्र अशी काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.
अर्ज कुठे करावा लागणार ?
या योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांना 31 मे 2025 पर्यंत अर्ज सादर करता येणार असल्याची माहिती संबंधितांकडून प्राप्त झाली आहे. जर तुम्हीही या योजनेसाठी अर्ज करू इच्छित असाल तर तुम्हाला http://www.mahajyoti.in/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे.