Ahilyanagar Railway : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि उन्हाळी सुट्ट्यांमुळे अनेक जण आपल्या मूळ गावाला गेलेले आहेत. तसेच काहीजण या काळात पिकनिकचा सुद्धा प्लॅन बनवत आहे. यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातही रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे आणि याच अनुषंगाने आता रेल्वे कडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे अहिल्यानगर आणि कोपरगाव मार्गे एक विशेष गाडी चालवणार आहे.

या विशेष गाडीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की उन्हाळी सुट्ट्यांच्या अनुषंगाने वाढणाऱ्या अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे कडून पुणे ते दानापूर दरम्यान नवीन विशेष गाडी चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
पुण्यावरून चालवली जाणारी ही गाडी अहमदनगर आणि कोपरगाव रेल्वे स्थानकावरून धावणार आहे आणि या दोन्ही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा मंजूर करण्यात आलेला आहे.
यामुळे अहिल्यानगर आणि कोपरगाव रेल्वे स्थानकावरून ये – जा करणाऱ्या प्रवाशांना या विशेष गाडीचा मोठा लाभ मिळणार आहे. दरम्यान, आता आपण पुणे – दानापुर विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या संपूर्ण वेळापत्रकाची माहिती जाणून घेणार आहोत.
कस आहे विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक?
पुणे दानापुर विशेष एक्सप्रेस ट्रेन म्हणजेच गाडी क्रमांक ०१४१७ ही नवीन रेल्वे गाडी आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी सायंकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी पुणे स्थानकावरून सोडली जाणार आहे. पुण्यावरून रवाना झाल्यानंतर ही गाडी तिसऱ्या दिवशी साडेसात वाजता दानापूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
परतीच्या प्रवासात दानापूर पुणे विशेष रेल्वे गाडी म्हणजेच गाडी क्रमांक ०१४१८ ही नवीन रेल्वे गाडी शुक्रवारी आणि मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता दानापूर रेल्वे स्थानकावरून रवाना होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५:३५ वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
या गाडीमुळे पुणे ते दानापुर आणि दानापुर ते पुणे हा प्रवास वेगवान होईल. याचा फायदा पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना सुद्धा मिळणार आहे.
कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार विशेष गाडी
ही विशेष गाडी पुणे जिल्ह्यातील दौंड कॉर्ड लाईन, तसेच नगर जिल्ह्यातील अहिल्यानगर आणि कोपरगाव या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.
तसेच मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छोकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर सुद्धा या गाडीला थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती यावेळी समोर आली आहे.