मोठी बातमी ! मुंबईवरून ‘या’ शहरासाठी सुरु होणार AC वंदे भारत स्लीपर ट्रेन !

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे मुंबईला लवकरच एका नव्या वंदे भारत स्लीपरची भेट मिळणार असून आज आपण याच नव्या गाडीच्या रूटबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

Published on -

Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. लखनऊ आणि मुंबई दरम्यान पहिली एसी स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे, जी राजधानी आणि शताब्दी गाड्यांना मागे टाकून रेल्वे प्रवासाला लक्षणीयरीत्या चालना देणारी ठरणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही वंदे भारत एक्सप्रेस हरदोई, शाहजहांपूर, बरेली, मुरादाबाद, गाझियाबाद, निजामुद्दीन आणि आग्रावरून धावणार आहे.

या वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे उत्तर प्रदेश राज्याच्या अनेक जिल्ह्यातील प्रवाशांना फायदा होणार आहे. दरम्यान आता आपण याच वंदे भारत स्लीपर ट्रेन च्या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कशी राहणार मुंबई – लखनऊ वंदे भारत स्लीपर?

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गेल्या अनेक महिन्यांच्या व्यापक सर्वेक्षणानंतर, रेल्वे अधिकाऱ्यांनी या स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

ही ट्रेन लखनऊहून प्रवास सुरू करेल आणि हरदोई, शाहजहांपूर, बरेली जंक्शन, रामपूर, मुरादाबाद, गाझियाबाद, हजरत निजामुद्दीन आणि आग्रा मार्गे मुंबईला पोहोचणार आहे. या गाडीला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर होणार आहे.

कशी असणार नवीन स्लीपर ट्रेनची रचना ? 

ही गाडी आठवड्यातून चार दिवस चालवली जाणार आहे. या ट्रेनमध्ये 20 पूर्णपणे वातानुकूलित कोच असतील ज्यात प्रथम, द्वितीय आणि तृतीय एसी वर्ग आणि दोन एसएलआर कोच असतील.

या गाडीतून सुमारे 1200 प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. अजून या गाडीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही मात्र याचे अधिकृत वेळापत्रक जूनमध्ये जाहीर केले जाईल असे अपेक्षित आहे, तर जुलैपर्यंत सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

ही नवीन गाडी मुंबईमध्ये वास्तव्याला असणाऱ्या उत्तर भारतातील प्रवाशांसाठी अधिक फायद्याची राहणार आहे. ही ट्रेन उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांसाठी, विशेषतः मुंबईला दैनंदिन कामानिमित्त येणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

सध्या बरेली ते लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस आणि रामनगर ते वांद्रे एक्सप्रेस सारख्या गाड्या धावत आहेत. पण या गाड्या अनेकदा हाउसफुल धावतात.

म्हणून या मार्गासाठी स्लीपर वंदे भारत एक अत्यंत आवश्यक पर्याय म्हणून पाहिला जात आहे. या गाडीमुळे प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!