महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात तयार होणार 494 कोटी रुपयांचा नवा रेल्वे मार्ग ! 18 लाख प्रवाशांना होणार फायदा

Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे विभागात एक नवीन रेल्वे मार्ग तयार होणार आहे. पुणे विभागाकडून या नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी सुद्धा मिळाली आहे. हा नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प राज्याच्या धार्मिक पर्यटनाला चालना देणारा राहणार आहे. दरम्यान आता आपण याच नव्या प्रकल्पाच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसा असणार नवा प्रकल्प?

आम्ही आपणास सांगू इच्छितो की पुणे रेल्वे विभागाकडून राहुरी ते शनिशिंगणापूरदरम्यानच्या नव्या रेल्वेमार्गास मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी जवळपास 495 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी ते शनिशिंगणापूर यादरम्यान तयार होणारा हा नवा मार्ग 494 कोटी रुपयांचा खर्च करून विकसित होणार आहे या मार्गाची एकूण लांबी ही जवळपास 22 किलोमीटर इतके राहणार असून याचा राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या एकात्मिक विकासात भर पडणार आहे.

शनिशिंगणापूर व्यतिरिक्त या तीर्थक्षेत्रांना सुद्धा होणार फायदा

नगर जिल्ह्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या या नव्या रेल्वे मार्गाचा 18 लाख प्रवाशांना फायदा होणार आहे. या नव्या मार्गामुळे राहुरी ते शनिशिंगणापूर हा प्रवास वेगवान होणार अशी आशा आहे. रेल्वे मंत्रालयाने स्वतः हा मार्ग अध्यात्मिक आणि पर्यटन दृष्टीने फारच महत्त्वाचा असल्याचे सांगितले आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की, नगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख धार्मिक स्थळ असून, येथे दररोज 45 ते 50 हजार भाविक येथे दर्शनासाठी येतात. शनिशिंगणापूर जवळ असणाऱ्या शिर्डीतही जगभरातील भाविक दर्शनासाठी दाखल होत असतात. यामुळे नवीन रेल्वेमार्गामुळे त्यांचा प्रवास अधिक जलद आणि सुरळीत होणार आहे. या मार्गामुळे शिर्डी, नेवासा, राहुरी येथील तीर्थस्थळे जसे की राहू-केतू मंदिर, मोहिनीराज मंदिर, पैस खांब हे प्रमुख तीर्थक्षेत्र एकमेकांना जोडले जातील. यामुळे साहजिक स्थानिक पर्यटन आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.