सोनं पुन्हा चमकलं ! एकाच दिवशी किंमत 1530 रुपयांनी वाढली ; 3 जून रोजी 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार ?

सोन खरेदीसाठी सराफा बाजारात जाणार आहात का मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची आहे. आज आपण तीन जून 2025 रोजी 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार याची माहिती पाहणार आहोत.

Published on -

Gold Price Today : जून महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच सोन्याचा तोरा पुन्हा वाढला आहे. खरे तर या महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर दबावात दिसलेत. मात्र आता पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ दिसत आहे. सोन्याच्या किमती एकाच दिवशी 1530 रुपयांनी वाढल्या आहेत.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, दहा दिवसांपूर्वी अर्थातच 26 मे रोजी दहा ग्रॅम शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार 640 रुपये एवढी होती. तसेच, या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच एक जून 2025 रोजी 10 g शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार 310 एवढी होती.

मात्र, आता पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीने एका लाखाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. एप्रिल महिन्याच्या 22 तारखेला सोन्याची किंमत एक लाख एक हजार 350 रुपये एवढी होती.

पुढे सोन्याच्या किमतीत घसरण झाली, सोन्याची किंमत तब्बल 93 हजार रुपयांपर्यंत खाली आली होती. मात्र पुन्हा एकदा गेल्या मे महिन्यात सोन्याची किंमत 99 हजार रुपयांपर्यंत वाढली आणि त्यानंतर काही काळ सोन्याच्या किमतीत थोडासा दबाव दिसला.

दरम्यान, आता पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीने एका लाखाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे आणि आज आपण 3 जून 2025 रोजी चे सोन्याचे रेट कसे आहेत याचा आढावा घेणार आहोत.

22 कॅरेट सोन्याच्या किमती

आज महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या सहा प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 610 प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आहे. याशिवाय आज नाशिक, लातूर, वसई विरार आणि भिवंडी या चार शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 640 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली आहे.

 24 कॅरेट सोन्याच्या किमती

मिळालेल्या माहितीनुसार आज राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या सहा प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 850 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आहे.

याशिवाय नाशिक, लातूर, वसई विरार आणि भिवंडी या चार शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 980 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आहे. म्हणजेच 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एका लाखाच्या अगदी जवळ पोहोचली आहे.

18 कॅरेट सोन्याचा किमती

आज राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या सहा प्रमुख शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,140 आणि नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी या चार शहरांमध्ये 74,170 रुपये प्रति 10g एवढी नमूद करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe