Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणूक करायची आहे का? मग आजची बातमीं तुमच्याच कामाची आहे. आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका भन्नाट बचत योजनेची माहिती पाहणार आहोत,ज्यामध्ये एकरकमी गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना दरमहा एक ठराविक रक्कम व्याज स्वरूपात मिळणार आहे.
खरंतर शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारख्या रिस्की ठिकाणी गुंतवणूक करण्याऐवजी अनेकजन बँकेच्या एफडी योजनेत आणि पोस्टाच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दाखवतात.

पोस्ट ऑफिसकडून वेगवेगळ्या बचत योजना सुरू करण्यात आली आहे आणि त्यामध्ये मंथली इन्व्हेस्टमेंट स्कीमचा सुद्धा समावेश होतो. पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्व्हेस्टमेंट स्कीममध्ये गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदारांना दरमहा व्याज दिले जाते.
कशी आहे MIS योजना?
खरंतर, पोस्टाच्या मंथली इन्वेस्टमेंट स्कीममध्ये एफडी योजनेप्रमाणे एक रकमीं गुंतवणूक करावी लागते. या योजनेत एकरकमीं गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदारांना ठराविक व्याजदराने परतावा मिळतो. सध्या या योजनेत गुंतवणूक केलेल्या रकमेवर गुंतवणूकदारांना 7.4 टक्के दराने रिटर्न दिले जात आहे.
पोस्ट ऑफिसची मंथली इन्व्हेस्टमेंट स्कीम पाच वर्षांनी परिपक्व होते आणि या पाच वर्षांच्या कालावधीत या योजनेतून गुंतवणूकदारांना 7.4% दराने रिटर्न मिळतात. खरंतर अलीकडे आरबीआय कडून रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली आहे.
रिझर्व बँक ऑफ इंडियाने रेपो रेट मध्ये गेल्या काही महिन्यांच्या काळात 0.50 टक्क्यांची कपात केली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी आरबीआय कडून रेपो रेटमध्ये 0.25% कपात करण्यात आली आणि त्यानंतर या चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला देखील आरबीआयने 0.25% कपात केली.
सध्या रेपो रेट सहा टक्के इतके आहेत आणि आगामी काळात यामध्ये आणखी कपात होण्याची शक्यता आहे. दरम्यान रेपो रेट मध्ये कपात झाल्यानंतर देशभरातील विविध बँकांकडून एफडीच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. मात्र पोस्टाच्या बचत योजनेचे व्याजदर अजूनही कायम आहेत. यामुळे पोस्ट ऑफिसची बचत योजना फारच फायद्याची राहणार आहे.
पाच लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?
पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्व्हेस्टमेंट स्कीममध्ये पाच लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार? MIS कॅल्क्युलेटर नुसार जर या योजनेत गुंतवणूकदारांनी पाच लाखांची गुंतवणूक केली तर त्यांना 7.40% दराने दर महिन्याला 3 हजार 83 रुपये व्याज मिळणार आहे.