सोन्याच्या किंमतीत मोठा बदल ! 4 जून 2025 रोजी 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? राज्यातील 22 आणि 24 कॅरेटचे रेट पहा

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. म्हणूनच आज आपण चार जून 2025 रोजीची 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत जाणून घेणार आहोत. 

Published on -

Gold Price Today : सोन खरेदीच्या तयारीत आहात का? मग सराफा बाजारात जाण्याआधी आजची ही बातमी पूर्ण वाचा. खरंतर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने बदल होतोय. आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.

एप्रिलमध्ये सोन्याची किंमत एका लाखाच्या वर पोहोचली होती आणि आता पुन्हा एकदा या मौल्यवान धातूची किंमत एका लाखाच्या वर जाणार असे चित्र तयार होत आहे. कारण आता सोन्याची किंमत एका लाखाच्या अगदी जवळ पोहोचली आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला अर्थातच एक जून 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार 310 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढी होती. यानंतर दोन जूनला शुद्ध सोन्याच्या किमतीत 1530 रुपयांची वाढ झाली.

तीन जूनला सोन्याची किंमत 220 रुपयांनी वाढली. काल तीन जून 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 99 हजार 60 रुपये एवढी नमूद करण्यात आली. आज चार जूनला देखील या मौल्यवान धातूच्या किमतीत वाढ झाली आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याची किंमत

22 कॅरेटची किंमत : आज मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव आणि ठाणे इथे 22 कॅरेट होण्याची किंमत 90 हजार 900 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली. तसेच नाशिक, लातूर, वसई विरार आणि भिवंडी येथे 22 कॅरेट सोन्याची किंमत 90930 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.

18 कॅरेट सोन्याची किंमत : आज मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव आणि ठाणे इथे 18 कॅरेट होण्याची किंमत 74 हजार 380 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली. तसेच नाशिक, लातूर, वसई विरार आणि भिवंडी येथे 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,410 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.

24 कॅरेट सोन्याची किंमत : आज मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव आणि ठाणे इथे 24 कॅरेट होण्याची किंमत 99 हजार 170 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली. तसेच नाशिक, लातूर, वसई विरार आणि भिवंडी येथे 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 200 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe