सातव्या वेतन आयोगाच्या सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी अपडेट ! ‘इतका’ वाढणार महागाई भत्ता

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे महागाई भत्ता वाढीच्या संदर्भात. खरेतर, जुलै महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती वाढणार याबाबत नवीन अपडेट हाती आले आहे.

Published on -

7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे महागाई भत्ता वाढीसंदर्भात. केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सातव्या वेतन आयोगातील शेवटची महागाई भत्ता (डीए) वाढ गेल्या वेळेपेक्षा चांगली राहणार अशी माहिती समोर येत आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सरकारने चालू कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या सहामाहीसाठी महागाई भत्त्यात 2% वाढ केली आहे. या वाढीमुळे महागाई भत्ता 53% वरून 55 टक्के एवढा झाला आहे. तसेच ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली आहे.

दरम्यान आता जुलै 2025 पासून पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढणार असून ही महागाई भत्ता वाढ सातवा वेतन आयोगातील शेवटची महागाई भत्ता वाढ ठरणार अशी माहिती जाणकारांकडून हाती येत आहे.

किती वाढणार DA ?

महागाई भत्ता वाढ अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI-IW) च्या आकडेवारीनुसार ठरत असते. जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधी मधील एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार जानेवारी 2025 पासून महागाई भत्ता किती वाढणार हे निश्चित झाले आहे.

तर दुसरीकडे आता जानेवारी ते जून 2025 या कालावधीमधील एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार किती वाढणार ? हे निश्चित होणार आहे.

दरम्यान आत्तापर्यंत एआयसीपीआयची जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या चार महिन्यांची आकडेवारी समोर आली असून लवकरच मे आणि जून या दोन महिन्याची आकडेवारी सुद्धा जाहीर होणार आहे.

ही आकडेवारी जाहीर झाल्यानंतर महागाई भत्ता किती वाढणार हे स्पष्ट होणार आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता यावेळी महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या 2 महिन्यांत म्हणजे मार्च आणि एप्रिलमध्ये AICPI-IW मधील ही वाढ दर्शवते की केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी (DA/DR) सुमारे 57.95% असू शकते म्हणजेच जुलै 2025 पासून DA 3% ने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तथापि, पुढील दोन महिन्यांत निर्देशांक किती वाढतो किंवा कमी होतो हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. म्हणजे मे आणि जून या दोन महिन्यांचा CPI-IW निर्देशांक केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना किती DA मिळेल? हे ठरवणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe