कामाची बातमी ! 500 रुपयांची नोट बंद होणार ? सरकारने दिली मोठी माहिती

सध्या सोशल मीडियामध्ये पाचशे रुपयांची नवीन नोट रद्द केली जाणार अशा आशयाचा मेसेज वेगाने व्हायरल होतोय. यामुळे सर्वसामान्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती तयार झाली आहे आणि याच बाबत आता सरकारकडून मोठी माहिती समोर येत आहे.

Published on -

500 Rupees Currency Note : नुकत्याच काही वर्षांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने 500 आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून भाग केल्या होत्या. यानंतर आरबीआयकडून 500 आणि 2000 रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या गेल्यात. दरम्यानच्या काळात आरबीआय कडून दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्यात आली.

दरम्यान आता नवीन 500 रुपयांची नोट पुढील वर्षापासून बंद होणार अशा आशयाची बातमी सोशल मीडियामध्ये तुफान वायरल होत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर या संदर्भातील व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे.

खरंच पाचशे रुपयांची नोट बंद होणार का? हा प्रश्न या निमित्ताने सर्वसामान्यांकडून उपस्थित होतो असून याच संदर्भात आता सरकारकडून एक महत्त्वाची माहिती जारी करण्यात आली आहे.

पाचशे रुपयांची नोट खरंच बंद होणार का 

पाचशे रुपयांची नोट पुढील वर्षी बंद होणार, असा संदेश सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यामुळे सर्वसामान्य ग्राहक चिंतेत आले आहेत.

युट्यूबवर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मार्च 2026 पर्यंत 500 रुपयांची नोट बंद करणार आहे. कॅपिटल टीव्ही नावाच्या एका युट्यूब चॅनलने असा दावा केला असून या संदर्भातील एक व्हिडिओ त्यांच्या चैनल वर पोस्ट करण्यात आला आहे.

दरम्यान या चैनल वर व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर लगेच तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि अनेकांच्या मनात असा प्रश्न पडला की पाचशे रुपयांची नोट टप्प्याटप्प्याने बंद केली जात आहे का? दरम्यान यावर आता सरकारने सुद्धा अधिकृत माहिती दिली आहे. सरकारने सोशल मीडियामध्ये पाचशे रुपयांची नोट बंद होणाऱ या आशयाची व्हायरल होत असणारी बातमी बनावट असल्याचे म्हटले आहे.

व्हिडिओमध्ये नेमके काय म्हटले आहे

youtube वर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये असे म्हटले गेले आहे की सरकारकडून टप्प्याटप्प्याने पाचशे रुपयांची नवीन नोट बंद केली जाणार आहे. महत्वाची बाब म्हणजे या व्हिडिओमध्ये ही प्रक्रिया मार्च 2026 पर्यंत पूर्ण होईल असाही दावा करण्यात आला आहे.

पीआयबी फॅक्ट चेक काय सांगते?

पाचशे रुपयांची नवीन नोट चलनातून बाद होणार, असा आशयाचा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून याच मेसेजची सत्यता पडताळण्यात आली. पीआयबी फॅक्ट चेकने याची सत्यता पडताळणी आणि यात असे आढळले की, आरबीआयने 500 रुपयांच्या नोटा रद्द करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

म्हणजे या नोटा अजूनही चलनात आहेत. आरबीआय कडून या नोटा जारी केल्या जात आहेत आणि स्वीकारल्या सुद्धा जात आहेत. यावरून हा व्हिडिओ दिशाभूल करणारा आहे आणि कोणत्याही अधिकृत विधानाने किंवा आरबीआय परिपत्रकाने त्याला पाठिंबा दिलेला नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News