टाटा हॅरियर EV बेस व्हेरियंट : फीचर्स, रेंज आणि किंमत काय मिळेल आणि काय नाही ?

Tata Harrier EV Base Variant नुकतेच लॉन्च झाले,बेस व्हेरिएंटमध्ये अनेकदा फीचर्स कमी असतात, यामुळे अनेकदा लोक हे व्हेरिएंट घेण्यासाठी टाळाटाळ करतात,मात्र टाटांनी बेस व्हेरियंटमध्ये अनेक फीचर्स दिले आहेत, चला जाणून घेऊयात ह्याबद्दल संपूर्ण माहिती.

Published on -

Tata Harrier EV ची वाट पाहणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या भारतात इलेक्ट्रिक कार्सची लोकप्रियता वाढत असताना, टाटाने त्यांच्या हॅरियरला नवीन इलेक्ट्रिक अवतारात लॉंच केली आहे. २१.४९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध होणाऱ्या या गाडीची बुकिंग २ जुलैपासून सुरू होणार आहे, ज्यामुळे भारतीय ग्राहकांना आता एकदम स्टायलिश, परंतु जागरूक पर्यावरणासाठी योग्य पर्याय हातात येणार आहे.

टाटा हॅरियर ईव्ही तीन वेगवेगळ्या ट्रिममध्ये बाजारात येईल अ‍ॅडव्हेंचर, फियरलेस आणि एम्पॉवर्ड. यात अ‍ॅडव्हेंचर हा बेस व्हेरिएंट असून, यात ६५ किलोवॅट क्षमतेची बॅटरी दिली आहे, तर त्याहून मोठ्या ७५ किलोवॅट क्षमतेच्या बॅटरीसह ६२७ किलोमीटरपर्यंतच्या ड्रायव्हिंग रेंजसाठी पर्यायही उपलब्ध राहणार आहे.

या कारमध्ये रियर-व्हील ड्राईव्ह (RWD) आणि ऑल-व्हील ड्राईव्ह (AWD) या दोन्ही प्रकारांसाठी ५०४ न्यूटन मीटर पर्यंत टॉर्क मिळेल, ज्यामुळे शहरातील रस्त्यांवरून ते निसर्गरम्य प्रवासापर्यंत सगळ्या परिस्थितीत गाडी सहज हाताळता येईल. हॅरियर ईव्ही ही Acti.ev+ प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली असून, क्रेटा इलेक्ट्रिक आणि महिंद्रा XUV 9e यांसारख्या इतर इलेक्ट्रिक कार्सशी स्पर्धा करेल.

या गाडीच्या इन्फोटेनमेंटसाठी १०.२५ इंचाचा टचस्क्रीन सिस्टम देण्यात आला आहे जो वायरलेस अ‍ॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करतो. संगीताचा अनुभव अधिक चांगला व्हावा म्हणून चार स्पीकर्स आणि दोन ट्विटर यांचा समावेश आहे. तसेच, १०.२५ इंचाच्या डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये नेव्हिगेशनसह सर्व महत्वाच्या माहितीचा सहज आढावा घेता येतो. ड्रायव्हिंग अधिक सोयीस्कर व्हावी म्हणून फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल, वायरलेस चार्जिंग पॅड आणि ४५ वॅट आउटपुट असलेला यूएसबी टाइप सी पोर्टही या कारमध्ये दिला आहे.

अ‍ॅडव्हेंचर व्हेरिएंट मध्ये मिळणाऱ्या फीचर्सबद्दल बोलायचं झाल्यात ह्यामध्ये कीलेस एंट्री, ऑटोमॅटिक एअर कंडिशनिंग आणि स्टीअरिंग कॉलमला टिल्ट-अँड-टेलिस्कोपिक अॅडजस्ट करण्याचा पर्याय आहे, तसेच ड्रायव्हर सीट मॅन्युअली उंची-अ‍ॅडजस्ट होणारी असून, लंबर सपोर्टही देण्यात आले आहे, तर मागील सीटसाठी स्प्लिट-फोल्डिंग बॅक आहे ज्यामुळे अधिक जागा तयार करता येते.

विविध ड्रायव्हिंग मोड्सचा पर्याय असल्याने, गाडी तुम्हाला तुमच्या गरजेनुसार इको, सिटी, स्पोर्ट किंवा ड्रिफ्ट मोडमध्ये सहज वापरता येईल. याशिवाय, नॉर्मल, रॉक क्रॉल, मड रट्स, स्नो/ग्रास, सँड आणि कस्टम सारखे टेरेन स्पेशल मोड्स देखील उपलब्ध आहेत, जे कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांवर सहज पार पडण्यास मदत करतात.

ही कार फक्त आरामदायक आणि तंत्रज्ञानाने परिपूर्णच नाही, तर सुरक्षिततेच्या दृष्टीनेही अत्यंत सज्ज आहे. इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, चार डिस्क ब्रेक्स, अनेक एअरबॅग्ज आणि टायर प्रेशर मॉनिटरिंगसह गाडी तुमच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेते. त्याचबरोबर, हिल-स्टार्ट असिस्ट, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, पॅडल शिफ्टर्स आणि बायडायरेक्शनल चार्जिंग यांसारखी सुविधाही दिल्या आहेत, ज्यामुळे कारचा अनुभव अधिक समृद्ध होतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe