SheshNaag train : काही ट्रेन या इतक्या खास असतात की त्या फक्त वाहतुकीपुरत्याच नसून आपल्या तंत्रज्ञानाची आणि कल्पकतेची झलक बनून राहतात. अशीच एक ट्रेन आहे शेषनाग नाव ऐकलं की क्षणभर आपण पुराणातल्या त्या विशाल नागाच्या प्रतिमेकडे ओढले जातो. आणि तुम्हाला हे ऐकून खरंच आश्चर्य वाटेल या ट्रेनला हे नाव अगदी विचारपूर्वक, आणि त्यामागे एक विलक्षण कारण आहे !
Another feather in its cap:
SheshNaag’ trainAfter successful running of 'SHESHNAG' now, Bilaspur Division of SECR operated 'SUPER SHESHNAG'- First ever long haul of 4 loaded trains from Korba with total load of 20906 tonnes. pic.twitter.com/fjihbjzmNM
— Ministry of Railways (@RailMinIndia) January 6, 2021
मित्रांनो शेषनाग ट्रेन ही भारतातील सगळ्यात लांब ट्रेनपैकी एक आहे इतकी लांब की तिचं वळणं आणि मार्गक्रमण बघताना ती जणू एखाद्या नागासारखी भासत राहते. या ट्रेनची एकूण लांबी जवळपास २.८ किलोमीटर आहे. हो, ऐकायला जसं विलक्षण वाटतं, तसंच ते प्रत्यक्षातही भव्यदिव्य आहे. ही ट्रेन ओढण्यासाठी एका किंवा दोन नव्हे, तर चार ते पाच इंजिनांची मदत घेतली जाते. म्हणजे कल्पना करा इतका मोठा लोखंडी अजस्र अजगर, देशाच्या पायाभूत व्यवस्थेला हलवून नेत आहे.
या ट्रेनचं वैशिष्ट्य केवळ तिच्या आकारात नाही, तर तिच्या कार्यक्षमतेतही आहे. कारण ही प्रवासी नव्हे, तर मालवाहू ट्रेन आहे. मालवाहतुकीच्या दृष्टीने एकाच वेळी अधिकाधिक डबे घेऊन जाण्याचं सामर्थ्य ही ट्रेन बाळगते आणि त्यामुळे ती औद्योगिक वाहतुकीचा एक अविभाज्य भाग ठरते. विशेष म्हणजे, ही ट्रेन २०२० मध्ये दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात पहिल्यांदा धावली. त्या वेळी ही भारतातील सगळ्यात लांब ट्रेन ठरली होती.
या ट्रेनला ‘शेषनाग’ हे नाव देण्यामागे एक सुंदर दृश्यात्मक विचार आहे. जसं पुराणांमध्ये शेषनाग हा विशाल सर्प पृथ्वीला आपल्या फण्यावर उचलून धरतो, तसंच हे ट्रेनसुद्धा देशाच्या उत्पादनक्षमता आणि व्यापार वाहतुकीचा एक मजबूत खांब आहे. जेव्हा ही ट्रेन वळणावरून मार्गक्रमण करते, तेव्हा तिचा लांबट वळण घेत असलेला आकृतीबंध पाहून ती अगदी नागासारखी भासते आणि म्हणूनच तिला हे नाव अगदी योग्य ठरतं.
यात अजून एक रंजक बाब आहे इतकी लांब ट्रेन स्टेशन पार करायला देखील दोन मिनिटांहून अधिक वेळ घेते. तिच्या प्रत्येक हालचालीत एक भव्यपणा आहे, आणि ती चालते तेव्हा जणू रेल्वे ट्रॅकवर एक प्रचंड यंत्रमानव आपलं काम शांतपणे पार पाडतोय, असा भास होतो.