Ahilyanagar News: अहिल्यानगर- बाजार समितीत रविवारी विविध भाजीपाल्याची १९९१ क्विंटल आवक झाली होती. यामध्ये १८ हजार ७० पालेभाजांच्या जुड्यांचा समावेश होता. यावेळी मेथीच्या ५०५ जुड्या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणल्या होत्या. यावेळी मेथी जुडीला २५ ते ४० रुपयांपर्यंत भाव मिळाला.
कोथिंबीर जुडीला ८ ते २५ रुपयांपर्यंत भाव
कोथिंबीरीच्या १७ हजार ६५ जुड्या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणल्या होत्या. यावेळी कोथिंबीर जुडीला ८ ते २५ रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेपू भाजीच्या ५०० जुड्यांची आवक झाली होती. शेपू जुडीला २० ते २५ रुपये भाव मिळाला. बाजार समितीत रविवारी ६२१ क्विंटल बटाट्यांची आवक झाली होती. बटाट्याला प्रतिक्विंटल ७०० ते २५०० रुपये भाव मिळाला.

टोमॅटोला प्रतिक्विंटल किमान ४०० रुपये भाव
अहिल्यानगर बाजार समितीत टोमॅटोची २९६ क्विंटल आवक झाली होती. टोमॅटोला प्रतिक्विंटल किमान ४०० रुपये, कमाल २२०० रुपये भाव मिळाला. वांग्याची ३५ क्विंटल आवक झाली होती. वांग्याला प्रतिक्विंटल किमान १०००, तर कमाल ४००० तर सरासरी २१५० रुपये भाव मिळाला.
गवारीला ४ हजार ते १० हजारापर्यंत भाव
फ्लॉवरची ११४ क्विंटल आवक झाली होती. फ्लॉवरला प्रतिक्विंटल १००० ते ६५०० रुपये भाव मिळाला. कोबीची १२३ क्विंटल आवक झाली होती, कोबीला २०० ते १२०० रुपये भाव मिळाला. काकडीची आवक ६० किंटल झाली होती तर ५०० ते २५०० ते रुपये भाव मिळाला. गवारीची साडेतेरा क्विंटल आवक झाली होती, भाव ४००० ते १० हजार रुपयांपर्यंत मिळाला.