Bajaj Finance : १ शेअरसाठी ४ बोनस आणि स्प्लिट! बजाज फायनान्समुळे गुंतवणूकदारांचे भाग्य बदलणार ?

Published on -

Bajaj Finance : शेअर बाजारात बजाज फायनान्स लिमिटेडने पुन्हा एकदा गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घेतलं. सकाळीच बाजार उघडताच या शेअरमध्ये खरेदीचा जोर दिसून आला आणि दिवसाच्या सुरुवातीला शेअरच्या किमतीत सुमारे ४ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. हा शेअर थेट ९७८८ रुपयांवर पोहोचला, जो शुक्रवारीच्या बंद भावाच्या तुलनेत सुमारे ४१७ रुपयांनी अधिक होता.

या वाढीचं कारण सरळसोपं आहे बजाज फायनान्सने नुकतीच बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे, आणि त्यासाठीची रेकॉर्ड डेटदेखील स्पष्ट केली आहे. १६ जून ही तारीख ठरवण्यात आली आहे. म्हणजे, ज्या गुंतवणूकदारांकडे त्या तारखेपर्यंत कंपनीचे शेअर्स असतील, त्यांनाच हे दोन्ही लाभ मिळणार आहेत.

कंपनीने ४:१ बोनस शेअर जाहीर केले आहेत. म्हणजे, ज्या गुंतवणूकदाराकडे १ शेअर आहे, त्याला चार अतिरिक्त शेअर्स मिळतील. याशिवाय, स्टॉक स्प्लिटदेखील १:२ प्रमाणात होणार आहे म्हणजे, एका शेअरचे दोन शेअर्स होतील. हे दोन्ही निर्णय गुंतवणूकदारांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात, कारण यामुळे शेअर्सची लिक्विडिटी वाढते आणि भाव सामान्य गुंतवणूकदारांना परवडतील अशा पातळीवर येतात.

गेल्या काही महिन्यांत बजाज फायनान्सचा शेअर सातत्याने वाढतच आहे. मागच्या एका वर्षात कंपनीने गुंतवणूकदारांना सुमारे ३३ टक्के परतावा दिला आहे. विशेष म्हणजे केवळ गेल्या एका महिन्यातच शेअरमध्ये ११ टक्क्यांची वाढ झाली आहे, आणि आठवड्याभरात तब्बल ५ टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. म्हणजेच, रेकॉर्ड डेटची घोषणा होताच बाजाराने त्या सकारात्मक संकेतांना झपाट्याने प्रतिसाद दिला आहे.

बजाज फायनान्स ही NBFC क्षेत्रातली एक नावाजलेली आणि विश्वासार्ह कंपनी आहे. तिच्या व्यवस्थापनाने वेळोवेळी गुंतवणूकदारांसाठी घेतलेले निर्णय, कंपनीच्या मजबूत आर्थिक स्थितीची झलक देतात. त्यामुळे, शेअर स्प्लिट आणि बोनससारख्या घोषणा केवळ बाजाराची दिशाच बदलत नाहीत, तर त्या भविष्यातील गुंतवणुकीसाठीही एक सकारात्मक संकेत देतात.

एक गोष्ट मात्र लक्षात घ्या १६ जून ही रेकॉर्ड डेट फार दूर नाही. त्यामुळे, या तारखेआधी शेअर्स आपल्या डीमॅट खात्यात आले पाहिजेत, तरच तुम्हाला बोनस आणि स्प्लिटचा फायदा मिळेल. बाजार सध्या या घोषणेकडे आशावादी नजरेने पाहत आहे, आणि तेच या शेअरच्या वाढत्या किमतीत दिसून येतं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News