मी निवृत्त होत आहे, मी थांबतो ; ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणतात…

Published on -

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-आपल्या आंदोलनाने आणि अहिसंक मार्गाने शासनास घाम फोडणारे आणि सर्वसामान्यांना अनेक गोष्टींमध्ये न्याय मिळवून देणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता निवृत्तीचे सूतोवाच केले आहे.

विजयादशमीचे औचित्य साधत रविवारी हजारे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. अण्णा यावेळी म्हणाले की, गावात 1975मध्ये कामाला सुरवात केली. जवळपास 45 वर्षांचा काळ लोटला.

गावातील सगळे कार्यकर्ते आज जे काम करीत आहेत, ते पाहून, प्रत्यक्षात काम करताना जेवढा आनंद झाला नाही, त्यापेक्षा अधिक आनंद आता होतो. यापुढेही मी काम सुरू ठेवले, तर कार्यकर्ते गहाळ पडतात.

तसे होऊ नये, यासाठी राळेगणसिद्धीच्या कामातून हळूहळू निवृत्त होत आहे. यावेळी बोलताना त्यांनी ‘गावातील हुशार व होतकरू मुला-मुलींच्या उच्चशिक्षणात पैशांअभावी कोणतीही अडचण येऊ नये,

यासाठी सात-आठ जणांचा ट्रस्ट स्थापन करावा. गावातून 10 लाख लोकवर्गणी जमा झाली, तर माझे स्वतःचे अडीच लाख रुपये ट्रस्टसाठी देईन. दर वर्षी त्यातून मदत होऊन मुला-मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल’ अशी सूचना हजारे यांनी केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!