Maharashtra Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुढील जुलै महिन्यात राज्यातील प्रवाशांसाठी एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू केली जाणार आहे. मध्य रेल्वेकडून ही नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार असून या नव्या गाडीमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नागपूर ते मिरज दरम्यान विशेष गाडी चालवणार आहे. या विशेष गाडीच्या नागपूर ते मिरज अशा दोन आणि मिरज ते नागपूर अशा दोन म्हणजेच एकूण चार फेऱ्या होणार आहेत.

दरम्यान आता आपण या विशेष गाडीचे संपूर्ण वेळापत्रक तसेच ही गाडी राज्यातील कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार या संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत.
कसं राहणार नव्या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक?
मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्यात येणाऱ्या आषाढी एकादशीच्या अनुषंगाने मध्य रेल्वे कडून नागपूर ते मिरज दरम्यान विशेष गाडी चालवली जाणार आहे. ही गाडी पंढरपूर रेल्वे स्थानकावर सुद्धा थांबा गेला आणि यामुळे पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना या विशेष गाडीचा मोठा लाभ होणार आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे वारकऱ्यांचा मोठा मेळा लागतो. दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात वारकरी गर्दी करतात आणि याच वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वे कडून ही विशेष गाडी चालवली जाणार आहे.
या विशेष एक्सप्रेस ट्रेन च्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर नागपूर मिरज विशेष एक्सप्रेस म्हणजे गाडी क्रमांक 01205 चार जुलै 2025 आणि 5 जुलै 2025 रोजी नागपूर रेल्वे स्थानकावरून सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ही गाडी अकरा वाजून 55 मिनिटांनी मिरज रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
तसेच परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01206 म्हणजेच मिरज नागपुर विशेष एक्सप्रेस ट्रेन सहा जुलै आणि सात जुलै 2025 रोजी मिरज रेल्वे स्थानकावरून दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी सोडले जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर बारा वाजून 55 मिनिटांनी पोहोचणार आहे.
कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन?
ही गाडी या मार्गावरील विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे. नागपूर – मिरज विशेष एक्सप्रेस ट्रेनला अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, अकोला, मूर्तिजापूर, शेगाव, भुसावळ, जळगाव,
चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड, कुडूवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, कवठेमहांकाळ, सलगर आणि अर्ग या महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.