थकवा आणि मानसिक तणाव दूर करण्यासाठी रोज दुधात ‘ही’ गोष्ट मिसळून प्या!

Published on -

जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल, थकवा वाटत असेल, तणाव येत असेल आणि शरीर नेहमीच कमकुवत वाटतं तर तुमच्यासाठी एक सोपा पण प्रभावी उपाय आहे. घरच्या घरी केलेला एक साधा प्रयोग तुम्हाला रोगांपासून दूर ठेवून शरीर आणि मन दोन्ही बळकट करू शकतो. आणि विशेष म्हणजे, यासाठी तुम्हाला कोणतेही महागडे सप्लिमेंट घेण्याची गरज नाही, फक्त दुधात थोडे मध घालायचे आहे.

मध

आयुर्वेदात मध हे एक शक्तिशाली आणि औषधी गुणांनी परिपूर्ण घटक मानलं जातं. मधात अँटीऑक्सिडंट्स, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत होते.

दूध हे स्वतःच कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि मिनरल्सने समृद्ध आहे. जेव्हा तुम्ही या दुधात 1-2 चमचे मध मिसळता, तेव्हा हे मिश्रण शरीरासाठी एक प्रकारचं नैसर्गिक टॉनिक बनतं. हे केवळ शरीराला बळकट करत नाही, तर मानसिक आरोग्यही सुधारतं.

दूध आणि मध एकत्र घेण्याचे फायदे

दूध आणि मध एकत्र घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सर्दी, खोकला, थकवा यापासून नैसर्गिक संरक्षण मिळतं. तसेच हृदय आरोग्य उत्तम राहतं. मधातील अँटीऑक्सिडंट्स आणि दूधातील कॅल्शियम एकत्र येऊन हृदयाला बळकटी मिळते. यामुळे चयापचय सुधारतो. वजन नियंत्रणासाठी हे मिश्रण उपयुक्त ठरते.

इतकंच नही तर, मानसिक तणाव देखील कमी होतो. मध नैसर्गिक तणाव निवारक असल्याने झोप सुधारते आणि मूडही चांगला राहतो. यामुळे त्वचा व केसांसाठी देखील फायदा मिळतो. शरीराच्या अंतर्गत स्वच्छतेमुळे त्वचा उजळते आणि केस मजबूत होतात.

सेवनाची योग्य पद्धत आणि खबरदारी

दररोज रात्री झोपण्यापूर्वी 250 मि.ली. कोमट दूध घ्या आणि त्यात 1-2 चमचे शुद्ध मध मिसळा. पिण्यापूर्वी दूध उकळल्यानंतर थोडं गार होऊ द्या, म्हणजे मधाचे गुणधर्म टिकून राहतील. मात्र, मधाची अ‍ॅलर्जी असल्यास किंवा मधुमेह असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. उकळत्या दुधात मध मिसळू नका, कारण त्यामुळे त्याचे औषधी गुणधर्म कमी होतात. गर्भवती महिला, टाइप-1 मधुमेह किंवा गंभीर आजार असलेल्यांनी सेवनापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News