कसोटीत कर्णधारपद भूषवत यशस्वी ठरलेले गोलंदाज कोण? या यादीत एका भारतीयाचाही समावेश!

Published on -

कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारपद ही जबाबदारी अनेकांना जड वाटते, विशेषतः जेव्हा तुम्ही एक प्रमुख गोलंदाजही असता. संघाचे नेतृत्व करताना स्वतःच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करणे ही मोठी कसरत असते. पण काही खेळाडूंनी ही दोन्ही भूमिका पार पाडत विक्रमही रचले. सध्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स अशाच यशस्वी कर्णधार-गोलंदाजांपैकी एक ठरला आहे. त्याने डब्ल्यूटीसी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात जबरदस्त गोलंदाजी करत 6 बळी घेतले आणि इतिहासाच्या पानांमध्ये स्वतःचं नाव कोरलं.

पॅट कमिन्स

पॅट कमिन्सने 2021 पासून ऑस्ट्रेलियाचे कसोटी नेतृत्व सांभाळले असून आतापर्यंत 34 सामन्यांत 136 विकेट्स घेतले आहेत. ही कामगिरी करताना त्याने एका यादीत आपलं नाव तिसऱ्या क्रमांकावर नोंदवलं आहे, ते म्हणजे कर्णधारपद भूषवताना कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज. कमिन्सच्या या कामगिरीने क्रिकेटजगतात एक नवा विक्रम बनला आहे.

इम्रान खान

या यादीत पहिलं नाव आहे पाकिस्तानचा महान अष्टपैलू इम्रान खान. 1982 ते 1992 या दशकात इम्रान खानने 48 कसोटीत कर्णधारपद सांभाळलं आणि त्यामध्ये तब्बल 187 विकेट्स घेतल्या. त्यांची कणखर नेतृत्वशैली आणि मैदानावरील आक्रमकता आजही आदर्श मानली जाते. दुसऱ्या क्रमांकावर आहेत ऑस्ट्रेलियाचे रिची बेनॉ, ज्यांनी 1958 ते 1963 या काळात 28 सामन्यांत 138 बळी घेतले होते.

कपिल देव

या यादीत वेस्ट इंडिजचा गॅरी सोबर्स, न्यूझीलंडचा डॅनियल व्हेटोरी आणि भारताचा महान अष्टपैलू कपिल देव यांची नावंही झळकतात. कपिल देव यांनी 1983 ते 1987 या काळात 34 कसोटीत भारताचं नेतृत्व करताना 111 विकेट्स घेतल्या, ज्यामुळे ते सहाव्या क्रमांकावर आहेत. ही कामगिरी त्यांच्या ऑलराऊंडक्षमतेचं एक ठोस उदाहरण ठरते.

वसीम अक्रम

यादीत शेवटचा उल्लेख आहे पाकिस्तानच्या वसीम अक्रमचा, ज्यांनी 25 कसोटीत कर्णधार म्हणून खेळताना 107 बळी घेतले. त्यांच्या इनस्विंग आणि आऊटस्विंगच्या जादूने अनेक फलंदाजांना गारद केलं होतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News