जर तुम्हालाही महिना संपण्याआधीच पगार संपल्याचं वारंवार जाणवत असेल, तर तुम्ही एकटे नाही. अनेकांना हीच अडचण भेडसावत असते. कितीही नियोजन केलं तरी खर्च आटोक्यात येत नाही. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खिशात रिकामे पाकिट आणि मनात चिंता असते. या समस्येचं उत्तर केवळ खर्च कमी करण्यात नाही, तर वास्तुशास्त्रात देखील दडलेलं आहे, असं मानलं जातं.

वास्तुशास्त्रानुसार, घरामधील काही दिशांचे पैशांशी आणि खर्चांशी थेट संबंध असतो. विशेषतः नैऋत्य आणि नैऋत्य-दक्षिण ही दिशा खर्चाची मानली जाते. या दिशेचा योग्य वापर न झाल्यास, अनावश्यक खर्च, आर्थिक तणाव आणि पगार टिकत नसेल असे त्रास संभवतात. अशा वेळी हे समजून घेणं गरजेचं आहे की, घराच्या रचनेतील काही बदल आपल्याला मोठा आर्थिक दिलासा देऊ शकतात.
काय उपाय कराल?
उदाहरणार्थ, जर या दिशेला हिरव्या रंगाची झाडं, वॉलपेपर किंवा डेकोरेशन ठेवलं असेल, तर ते घरातील पैशाच्या स्थैर्यास अडथळा ठरू शकतं. हिरवा रंग नैऋत्य-दिशेसाठी अनुकूल नसतो. त्यामुळे या भागात असलेले हिरवे रोप किंवा डिझाइन त्वरित काढून टाकणं हितावह ठरतं. त्याचप्रमाणे या दिशेने महत्वाचे आर्थिक कागदपत्रे किंवा रोख रक्कम ठेवणं देखील टाळावं.
वास्तुच्या नियमांनुसार या दिशेला नेहमी स्वच्छ, मोकळी आणि हलक्या रंगात ठेवणं विशेष शुभ मानलं जातं. क्रीम किंवा ऑफ-व्हाइट रंग भिंतींवर असतील, तर ते खर्च नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. या दिशेचा योग्य वापर केला, तर घरात न फुकट खर्च होणाऱ्या गोष्टी कमी होतात तर पगार जास्त काळ टिकतो, असं अनुभवी वास्तुशास्त्रज्ञ सांगतात.
वास्तुशास्त्र हे केवळ धार्मिक किंवा पारंपरिक विषय नाही, तर त्यामागे एक विशिष्ट विचारसरणी आहे. एखाद्या जागेची उर्जा आणि त्याचा आपल्या मन:स्थितीवर आणि निर्णयांवर होणारा परिणाम ही वास्तुची खरी ताकद आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की खर्च आटोक्यात येत नाहीत, तर एकदा वरील सांगितलेले उपाय नक्की करून पाहा.